मुंबई - बॉलिवूडचा 'पठाण' शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चित्रपटसृष्टीत एक मोठी घटना घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. खरंतर शाहरुख खान त्याची लाडकी मुलगी सुहाना खानसोबत एक चित्रपट करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती 'पठाण' दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि शाहरुख खान दोघे मिळून करणार आहेत. शाहरुख आणि सिद्धार्थच्या जोडीच्या 'पठाण' चित्रपटाने जगभरात खळबळ उडवून दिली होती. आता पुन्हा एकदा ही जोडी बॉलिवूडमध्ये वादळ निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
आता ही बातमी शाहरुखच्या चाहत्यांसाठी मोठ्या पार्टीपेक्षा कमी असणार नाही. 'द आर्चीज' चित्रपटातून सुहाना खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच चाहत्यांसाठी एवढी मोठी बातमी ऐकायला मिळणे ही त्यांच्यासाठी एखाद्या धमाक्यापेक्षा कमी नाही.
चित्रपटाचे नाव काय असेल? - मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थ आनंद पुन्हा एकदा शाहरुख खानसोबत धमाका करण्याच्या तयारीत आहे. यावेळी सिद्धार्थ बॉलिवूडचा पठाण शाहरुख आणि त्याची मुलगी सुहाना खान यांना एकत्र सादर करण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. हा चित्रपट शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मार्फलिक्स या बॅनरखाली बनवला जाणार आहे.
चित्रपटाच्या निर्मितीचे काम सुरू - मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या निर्मितीचे काम सुरू झाले आहे. आता हा चित्रपट शुटिंगसाठी सेटवर जाण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. मात्र, शाहरुख खान आणि त्याची मुलगी त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी खूप उत्सुक असल्याचे बोलले जात आहे.
शाहरुख खानची भूमिका काय असेल? - आलिया भट्टच्या 'डियर जिंदगी' चित्रपटात शाहरुखने जी भूमिका केली होती तशीच भूमिका तो सुहानसोबतच्या या चित्रपटात करणार आहे. अलिकडेच सुहानाने नुकतेच तिच्या डेब्यू चित्रपट द आर्चीजचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि सलमान खानसोबत 'पठाण वर्सेस टायगर' हा चित्रपटही बनवणार आहे. २०२४ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो, असे सांगण्यात येते.
हेही वाचा -
२. Kangana Ranaut interview : नेपोटीझम विरोधात जाहीर भूमिका घेणारी पहिली अभिनेत्री, कंगना रनौत!
३. Thalapathy Vijay courts controversy : ना रेडी गाण्यात धुम्रपान केल्याबद्दल थलपथी विजयवर खटला दाखल