पुणे आमिर खानचा लाल सिंग चड्ढा सिनेमा जगभरात सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाविषयी प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हा चित्रपट बहिष्कार करावा अशी मागणी सोशल मीडियावर चालू असताना बहुतांशी लोकांच्या पसंतीस उतरला आहे. अनेक सेलिब्रिटींनीही लाल सिंग चड्ढाला ब्लॉकबस्टर पदावर नेऊन बसवलं आहे. काहींनी या चित्रपटाला विरोध केला आहे तर काहींनी या सिनेमाला सपोर्ट केला आहे. यावर विरोधी पक्ष नेता अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला.
उत्तर देताना अजित पवार म्हणाले की मी तो चित्रपट पाहिला नाही आणि पहिला नाही त्यामुळे मत कस व्यक्त करणार. असे अनेक चित्रपट निघाले आणि ते प्रदर्शित होताना अनेकवेळा अशी चर्चा झाली की ते बॉयकॉट करा. पण मला अस वाटत आहे की यात काहीतरी वेगळं कारण आहे.
ते पुढे म्हणाले की एक चित्रपट आला होता पद्मावती. त्या चित्रपटाबाबत पद्मावतीच पदमावत झालं म्हणून लोकांनी जाऊन चित्रपट बघितला. त्यामुळे विरोध झाला की लोक जाऊन बघतात. तसं या चित्रपटाला विरोध करणे म्हणजे पब्लिसिटी स्टंटचा भाग नाही ना, असा विचार येतो पण यासाठी सेन्सॉर आहे आणि सेन्सॉर बोर्डने ते पहायचं असतं. ते जर चुकीचं असेल तर ते तिथच बॅन करतील अस देखील यावेळी पवार म्हणाले.
हेही वाचा - जान्हवी कपूरने आई श्रीदेवीच्या जयंतीदिनी शेअर केली भावनिक पोस्ट