ETV Bharat / entertainment

Satish Kaushiks daughter Vanshika : सतीश कौशिक यांची मुलगी वंशिकाने वाचले भावनिक पत्र; म्हणाली आपण ९० वर्षांनी पुन्हा भेटू... - दिवंगत अभिनेते सतीश कौशिक

दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांची ११ वर्षांची मुलगी वंशिका हिने गुरुवारी अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित समारंभात त्यांच्या निधनानंतर त्यांना लिहिलेले पत्र वाचून दाखवले.

Satish Kaushiks daughter Vanshika
सतीश कौशिक यांची मुलगी वंशिकाने वाचले भावनिक पत्र
author img

By

Published : Apr 14, 2023, 5:14 PM IST

हैदराबाद : गुरुवारी सतीश कौशिक यांचा वाढदिवस त्यांच्या कुटुंबीयांनी आणि जवळच्या मित्रांनी मुंबईत साजरा केला. बॉलीवूड अभिनेता आणि सतीशचा 48 वर्षांचा मित्र अनुपम खेर आणि सतीश कौशिक यांची पत्नी शशी यांनी या मार्मिक मेळाव्याचे आयोजन केले होते. ज्यामध्ये त्यांची 11 वर्षांची मुलगी वंशिका हिने तिच्या वडिलांसाठी अंत्यसंस्कार करण्यापूर्वी लिहिलेले पत्र मोठ्याने वाचले. भावनिक चिठ्ठी वाचून, वंशिकाने तिच्या वडिलांना एक विनंती केली होती, ती म्हणजे 90 वर्षांनी त्यांना भेटण्याची इच्छा असल्याने पुनर्जन्म घेऊ नये.

वंशिकाचे हृदयद्रावक पत्र : गेल्या महिन्यात होळी साजरी केल्यानंतर सतीशला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्याऐवजी, अभिनेता अनुपम खेर यांनी त्यांचा जन्म साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि गुरुवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त, वंशिकानी त्यांच्या निधनानंतर तिच्या वडिलांना लिहिलेले एक हृदयद्रावक पत्र वाचून दाखवले. प्रत्येकाने दिवंगत अभिनेत्यासोबतच्या आठवणी सांगितल्या आणि त्यांनी एकत्र घालवलेल्या चांगल्या वेळेची आठवण करून दिली.

वंशिकाच्या पत्रात असे लिहिले होते : हॅलो पप्पा, मला माहित आहे की तुम्ही आता आमच्यासोबत नाही, पण मी तुमच्यासाठी नेहमी तिथे असेन. तुमच्या मित्रांनी मला धाडसी व्हायला शिकवले, पण मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. मला तुमची खूप आठवण येते. मला माहीत असते हे घडणार आहे तर मी तुमच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी शाळेत गेले नसते. माझी इच्छा होते की मी तुम्हाला एकदाच मिठी मारली असती.

तुम्ही पुनर्जन्म घेऊ नका : जर मी माझा गृहपाठ केला नाही तर मला मम्मापासून कोण वाचवेल? मला आता शाळेत जायचे नाही. माझे मित्र काय म्हणतील याची मला खात्री नाही. ते माझ्यावर हसले तर? तूम्ही दररोज माझ्या स्वप्नात मला भेटायला या. मी तुमच्यासाठी प्रार्थना केली आहे. मला माहीत आहे की तू स्वर्गात, रोल्स रॉईस, फेरारी आणि लॅम्बोर्गिनीसह मोठ्या हवेलीत आनंदी जीवन जगत आहे. तुम्ही स्वादिष्ट जेवण खा. आपण ९० वर्षांनी पुन्हा भेटू. तुम्ही पुनर्जन्म घेऊ नका; मी तुम्हाला 90 वर्षांनी भेटेन. मला लक्षात ठेवा, मी तुम्हाला कधीही विसरणार नाही. तुम्ही माझे जगातील सर्वोत्तम वडील आहात.

मित्राचा वाढदिवस साजरा : अनुपम यांनी आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्याचे का ठरवले हे देखील सांगितले. 4-5 दिवसांपूर्वी सतीश माझ्या स्वप्नात दिसला आणि म्हणाला, 'यार तू मेरे लिए कुछ नहीं कर रहा है क्या (तू माझ्या वाढदिवसासाठी काही करत नाहीस का)?' त्यामुळे मी आज सतीशचे जीवन साजरे करण्याचे ठरवले, असे ते म्हणाले.

हेही वाचा : Malaika Arora with Arjun Kapoor : अर्जुन कपूरसोबत अज्ञात स्थळी रवाना झालेल्या मलायकाने दिली उपडेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.