ETV Bharat / entertainment

Sarla Ek Koti Movie: सत्य घटनेवर आधारित 'सरला एक कोटी'चे ट्रेलर लॉन्च, प्रेक्षकांना मिळणार श्रवणीय गाण्यांची पर्वणी

अभिनेत्री ईशा केसकर 'सरला एक कोटी' या सिनेमात अभिनेता ओंकार भोजनेसोबत स्क्रिन शेअर करत आहे. या चित्रपटात प्रमुख पात्र सरला आणि भिकाच्या नशिबाची गोष्ट मांडण्यात आली असून नुकतेच 'सरला एक कोटी' (Sarla Ek Koti Movie) या चित्रपटाचे ट्रेलर लाॅंच करण्यात (trailer and music launch) आले. त्याचवेळी सिनेमाचे संगीतही लाँच केले.

Sarla Ek Koti
सरला एक कोटी
author img

By

Published : Jan 10, 2023, 5:36 PM IST

मुंबई : नवलवाडीतील निरागस, सौंदर्याची खाण असलेली सरला आणि तिचा भोळा-भाबडा नवरा भिका यांच्या नशिबाची गोष्ट या चित्रपटात सांगण्यात आलेली आहे. पत्ते खेळण्यात तरबेज असलेला भिका डावात हारतो आणि आपल्या सुंदर बायकोला डावावर लावतो. मग पुढे काय होते याची गोष्ट चित्रपटात सांगितली आहे. सरलाच्या भूमिकेत अभिनेत्री ईशा केसकर (Isha Keskar) आणि भिकाच्या भूमिकेत ओंकार भोजने (Onkar Bhojane) यांनी कमाल केली आहे. या दोघांसोबत असणाऱ्या तगड्या स्टारकास्टमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

प्रेक्षकांना श्रवणीय गाण्यांची पर्वणी मिळणार : या चित्रपटात तीन गाणी आहेत. 'केवड्याचं पान तू' (Kevdyach pan tu) या गाण्याचे गायक अजय गोगावले (Ajay Gogavale) आणि आर्या आंबेकर (Aarya Ambekar) हे आहेत. 'थाऱ्यावर जीव राहिना' (Tharyavr Jeev rahina) या गाण्याला वैशाली माडे यांनी चार चाँद लावले आहेत. तर, 'सई माय साजणी' हे गाणे सायली खरे हिने गायले आहे.

गुरू ठाकूर यांच्या शब्दांची जादू : गाणी ऐकून असे वाटते की, चित्रपटाला त्यातील संगीताने चार चाँद (trailer and music launch) लावले असून प्रेक्षकांना श्रवणीय गाण्यांची पर्वणी मिळणार आहे. 'सरला एक कोटी'च्या (Sarla Ek Koti Movie) ट्रेलर आणि आणि म्युझिक लॉन्चचा हा सोहळा मुंबईत दिमाखात पार पडला. सर्व गाण्यांना विजय गवंडे यांनी संगीत दिले आहे, तर गुरू ठाकूर यांच्या शब्दांनी नेहमीप्रमाणेच जादू केली आहे. म्युझिक लॉन्च सोहळ्याला अल्ट्रा समूहाचे सुशिलकुमार अगरवाल आणि बिझनेस हेड श्याम मळेकर उपस्थित होते. ओंकार आणि ईशाची जोडी मोठ्या स्क्रिनवर काय कमाल करेल याचा अंदाज येत आहे. आणखी एक बाब म्हणजे चित्रपटामधले संवाद आणि पार्श्वसंगीत हे अत्यंत आकर्षित करणारे आहेत.

चित्रपटात महत्वाच्या भूमिका : अभिनेत्री छाया कदम यांनी सरलाची प्रेमळ सासू आणि भिकाच्या आईची भूमिका केली आहे. याशिवाय कमलाकर सातपुते, रमेश परदेशी, वनिता खरात, सुरेश विश्वकर्मा, विजय निकम, अभिजीत चव्हाण, यशपाल सारनात या कलाकारांच्या भूमिका चित्रपटात आहेत. सानवी प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत आणि आरती चव्हाण निर्मित 'सरला एक कोटी' या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट 'आटपाडी नाईट्स'चे नितीन सिंधुविजय सुपेकर यांचे आहे. हा चित्रपट नवीन वर्षात २० जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.