ETV Bharat / entertainment

Sara Ali Khan : सारा खाननं सांगितला पोटाची चरबी कमी करण्याचा अनुभव, कोलाज फोटो केला शेअर - सारा अली खान फोटोंचा कोलाज

सारा अली खाननं सोमवारी रात्री तिच्या सोशल मीडियावर दोन आठवड्यांत पोटाची चरबी कमी करण्याचा तिचा अनुभव शेअर केला. तिनं स्वत:च्या शरीरात झालेला बदल दाखवणारा फोटोंचा कोलाज शेअर केला आहे. या संघर्षात तिनं जे साध्य केलंय त्यावर ती समाधानी आहे.

Sara Ali Khan
सारा खाननं सांगितला पोटाची चरबी कमी करण्याचा अनुभव,
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2023, 1:05 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खाननं अलिकडेच पार पडलेल्या मनीष मल्होत्रा दिवळी पार्टीत चमकदार पोशाखात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पार्टीत तिनं एक सुंदर लेहेंगा परिधान केला होता. त्यानंतर सारानं दोन आठवड्यांच्या कालावधीत पोटाची चरबी कमी करण्याचा तिचा प्रवास अभिमानाने दाखवत, स्वतःचा एक प्री-ट्रान्सफॉर्मेशन फोटो शेअर केलाय. सुरुवातीला संकोच वाटत असला तरी सारा अलीनं तिच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केलंय.

सोमवारी सारानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर अलीकडील इव्हेंट्समधील ग्लॅमरस फोटोंचा कोलाज शेअर केला. तसंच पोटाची चरबी कमी करण्यासाठी तिनं काही काळ केलेल्या संघर्षाचाही उल्लेख केलाय. फोटोसह तिनं म्हटलंय, 'प्रामाणिकपणे सांगायचं तर हा टॉपचा फोटो अपलोड करताना अस्वस्थ वाटतंय. पण हे सर्व मी 2 आठवड्यात साध्य करु शकले याबदद्ल मला अभिमान वाटतो. वजन वाढणं ही माझ्यासाठी नेहमीच अडचणीच ठरलंय आणि यासाठीच्या संघर्षात डॉ. सिद्धांत भार्गव आणि फुड दर्जी यांनी मला मार्गावर आणल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. बाय-बाय हॉलिडे कॅलरीज पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपराधीपणापासून शांतता मिळतेय. फिटनेस हा एक प्रवास आहे त्यामुळे पुढे जात राहिलं पाहिजे.'

पीसीओडी (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) मुळे वजन वाढतं, त्यामुळे या आव्हानाबद्दल सारा अलीनं नेहमीच चर्चा केलीय. कॉलेजमध्ये शिकत असताना तिचं वजन 96 किलो होतं. त्याकाळात तिनं अभिनय करण्याचा निर्णय घेतला, यासाठी तिला वजन कमी करणं अपरिहार्य होतं. हे ध्येय गाठण्यासाठी तिन खूप मोहनत घेतली.

कामाच्या आघाडीवर सारा अली खान 'कॉफी विथ करण' शोच्या आठव्या सिझनमधील आगामी भागात अनन्या पांडेसोबत दिसणार आहे. या भागात तिनं पहिल्यांदाच तिच्या आणि शुभमन गिलच्या डेटिंगच्या चर्चेबाबत मौन सोडलं. अनन्यानंही यामध्ये दिलखुसास उत्तरं देऊन अनेक खुलासे केलेत. चित्रपटाच्या आघाडीवर सारा अली खान 'ए वतन मेरे वतन', 'मेट्रो... इन दिनो', 'मर्डर मुबारक' आणि आणखी एका शीर्षक न ठरलेल्या चित्रपटात काम करत आहे.

हेही वाचा -

  1. Rashmika Mandanna Deepfake Video: 'मला सुरक्षित वाटते', बिग बीनं पाठिंबा दिल्याबद्दल रश्मिकानं मानलं आभार

2. Raha Kapoor birthday : रणबीर आलियाची लेक राहाचा पहिला वाढदिवस ठरला '1 नंबर' संस्मरणीय

3. Sam Bahadur: विकी कौशल, मेघना गुलजार आणि सान्या मल्होत्रा 'सॅम बहादूर' ट्रेलर लॉन्चसाठी दिल्लीत दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.