ETV Bharat / entertainment

इमर्जन्सी चित्रपटातील संजय गांधी यांचा फर्स्ट लूक रिलीज - Movie Emergency

संजय गांधी फर्स्ट लूक: इमर्जन्सी चित्रपटातील दिवंगत नेते संजय गांधी यांचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.

संजय गांधी यांचा फर्स्ट लूक रिलीज
संजय गांधी यांचा फर्स्ट लूक रिलीज
author img

By

Published : Sep 13, 2022, 10:52 AM IST

मुंबई - बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतचा बहुप्रतिक्षित इमर्जन्सी चित्रपटातील दिवंगत नेते संजय गांधी यांचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी (१३ सप्टेंबर) कंगना रणौतने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर संजय गांधींचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. चित्रपटात संजय गांधींच्या भूमिकेत दक्षिणेतील अभिनेता विशाक नायर दिसणार आहे.

संजय गांधींचा फर्स्ट लूक शेअर करताना कंगना रणौतने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिले, 'प्रतिभेचे पॉवरहाऊस संजय गांधी, संजय इंदिराजींचा आत्मा होता आणि इंदिराजींनी त्यांना सर्वात जास्त प्रेम दिले आणि हेच सर्वात मोठे नुकसान त्यांच्यासाठी झाले.

संजय गांधींची भूमिका कोणता अभिनेता करतोय? - अभिनेत्री कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटात विशाक नायर संजय गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. विशाक हा मल्याळम सिनेमातील तरुण अभिनेता आहे. 2016 मध्ये तो पहिल्यांदा 'आनंदम' या मल्याळम चित्रपटात दिसला होता.

त्यानंतर 2021 मध्ये त्याने 'तोहफा' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तो 'रथ' (2021) चित्रपटात दिसला होता. विशाक शेवटचा नेटफ्लिक्स मालिका (हिंदी) 'चंदन' (2022) मध्ये दिसला होता.

कंगना रणौत या चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटात श्रेयस तळपदे अटल बिहारी वाजपेयी, अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण सॅम माणेकशॉच्या भूमिकेत, महिमा चौधरी लेखक पुपुल जयकर आणि अभिनेता अनुपम खेर लोकनायक जय प्रकाश नारायण यांच्या भूमिकेत आहेत.

सध्या या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून, त्यात कंगना रणौतने इंदिरा गांधींच्या भूमिकेत जीव ओतला आहे. त्याचबरोबर आता चाहते चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत आहेत. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

हेही वाचा - स्क्विड गेम अभिनेता ली जंग जे यांने मानले नेटफ्लिक्ससह दिग्दर्शकाचे आभार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.