ETV Bharat / entertainment

संजय दत्तने चाहत्यांना दिल्या हनुमान जयंतीच्या शुभेच्छा - हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

संजय दत्तने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याचा एक चांगला फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, "सब सुख लहै तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना। जय हनुमान", तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

संजय दत्त हनुमान जयंती
संजय दत्त हनुमान जयंती
author img

By

Published : Apr 16, 2022, 1:30 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा तगडा अभिनेता संजय दत्त सध्या 'KGF: Chapter-2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. रॉकिंग स्टार यश स्टारर चित्रपटात संजय दत्तने अधीराची भूमिका साकारली आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड हा चित्रपट मोडत आहे. दरम्यान, आज (16 एप्रिल) देशभरात हनुमान जयंती साजरी केली जात आहे. यावेळी संजय दत्तने एक फोटो शेअर करत चाहत्यांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

संजय दत्त हनुमान जयंती
संजय दत्त हनुमान जयंती

संजय दत्तने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याचा एक चांगला फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, "सब सुख लहै तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना। जय हनुमान, तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा."

यापूर्वी संजय दत्तनेही चाहत्यांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. संजय दत्तच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, KGF-2 व्यतिरिक्त अभिनेता 'घुडचढी' हा चित्रपटही करत आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा ९० च्या दशकातील सुंदर अभिनेत्री रवीना टंडन त्याच्यासोबत दिसणार आहे.

या चित्रपटाचे शूटिंग गेल्या महिन्यातच सुरू झाले होते. टीव्ही अभिनेता पार्थ समथान या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. गुलशन कुमार यांची मुलगी खुशाली कुमार या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार यांनी केली असून बिनॉय गांधी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

चित्रपटांव्यतिरिक्त संजय दत्त सोशल मीडियावरही सक्रिय असतो. तो रोज त्याचे अप्रतिम फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. अभिनेत्याने KGF-2 चित्रपटातील त्याचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा - महेश भट्टच्या मिठीत रणबीरला पाहून अनेकांची ह्रदये पाझरली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.