ETV Bharat / entertainment

12th fail Movie: संजय दत्त आणि फरहान अख्तर यांनी विक्रांत मॅसी स्टारर 'ट्वेल्थ फेल'चं केलं कौतुक ; शेअर केली पोस्ट... - संजय दत्तनं शेअर केली पोस्ट

12th fail Movie: विधू विनोद चोप्राचा 'ट्वेल्थ फेल'ला चांगलाच सकारत्मक प्रतिसाद मिळत आहे. अलीकडेच बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि फरहान अख्तर यांनी चित्रपटाचे कौतुक करत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

12th fail Movie
ट्वेल्थ फेल चित्रपट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2023, 3:18 PM IST

मुंबई - 12th fail Movie: बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माता, विधू विनोद चोप्रा त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ट्वेल्थ फेल' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचाच नाही तर सेलिब्रिटींचाही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 'ट्वेल्थ फेल' चित्रपटामध्ये अभिनेता विक्रांत मॅसी, मेधा शंकर, संजय बिश्नोई आणि हरीश खन्ना यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. दरम्यान, संजय दत्त आणि फरहान अख्तर यांनी या चित्रपटाचे निर्माते विधू विनोद आणि विक्रांत मॅसी यांचे कौतुक केले आहे. हा चित्रपट 25 कोटीमध्ये निर्मित झाला आहे. आतापर्यत या चित्रपटानं 8.24 कोटीची कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे.

संजय दत्तनं शेअर पोस्ट : संजय दत्तनं इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करून विक्रांत मॅसी स्टारर चित्रपटाचे कौतुक केले. या पोस्टमध्ये त्यानं 'ट्वेल्थ फेल'चं कौतुक करताना लिहलं, 'विधू विनोद चोप्राचा 'ट्वेल्थ फेल' हा एक हृदयस्पर्शी चित्रपट आहे, जो आपल्याला कथन करतो की आपण कधीही आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणं थांबवू नये. परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार न मानण्याची प्रेरणा यातून मिळते.

फरहान अख्तरनं शेअर केली पोस्ट : फरहान अख्तरनंही एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानं सांगितलं की, हा चित्रपट पाहून तो खूप प्रभावित झाला आहे. याशिवाय त्यानं विधू विनोद चोप्राचं अभिनंदन करत विक्रांत मॅसीच्या अभिनयाचेही त्यानं कौतुक केले आहे. फरहाननं वैयक्तिकरित्या मनोज कुमार शर्मा यांच्याशी संवाद साधल्यामुळे तो त्यांच्या जीवनकथेने आणि सिनेमॅटिक कहाणीनं भारावून व प्रेरित झाल्याचं त्यानं सांगितलं आहे. त्यानंतर त्यानं उर्वरित कलाकार आणि क्रू यांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.

'ट्वेल्थ फेल'ला सकारात्मक प्रतिसाद मिळाला : निर्माता विधू विनोद चोप्रा यांचा 'ट्वेल्थ फेल' चित्रपट 27 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. विधू विनोद चोप्राचा 'ट्वेल्थ फेल' हा अयशस्वी आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या वास्तविक जीवनातील कथेपासून प्रेरित आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणार असं सध्या दिसत आहे.

हेही वाचा :

  1. Dunki Teaser : शाहरुख खानच्या वाढदिवसाला 'डंकी'चा टीझर होईल प्रदर्शित....
  2. Urfi Javed receives death threat : उर्फी जावेदला जीवे मारण्याची मिळाली धमकी ; शेअर केली पोस्ट
  3. Angad Bedi dedicates gold medal : अंगद बेदीनं अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील सुवर्णपदक वडील बिशन सिंग बेदींना केलं समर्पित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.