मुंबई - अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूचा 'यशोदा' हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला. या चित्रपटातील तिच्या भूमिकेची सध्या खूप चर्चा होत आहेत. यातील साहसी दृष्यांसाठी तिने कठोर मेहनत केली होती. या चित्रपटामधील अॅक्शन सीनसाठी तिने हार्डकोर प्रशिक्षण घेतले होते. याचा एक व्हिडिओ तिने शेअर केला आहे.
रविवारी सामंथाने तिच्या इंस्टाग्रामवर हा शिक्षण व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांना एक ट्रीट दिली आहे. व्हिडिओमध्ये ती सेटवर अॅक्शन मूव्हचा सराव करताना दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
चित्रपटात, सामंथाने एका सरोगेट आईची भूमिका साकारली आहे. ती एका गंभीर वैद्यकीय गुन्ह्याचे रहस्य धैर्याने उलगडताना दिसते. यशोदा हा एक बहुभाषिक चित्रपट आहे, ज्याचे चित्रीकरण तमिळ आणि तेलुगूमध्ये झाले असून हिंदी, कन्नड आणि मल्याळम या तीन अतिरिक्त भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
सामंथा व्यतिरिक्त, लोकप्रिय अभिनेत्री वरलक्ष्मी सरथकुमार, उन्नी मुकुंदन, राव रमेश, मुरली शर्मा, संपत राज, शत्रु, मधुरिमा, कल्पिका गणेश, दिव्या श्रीपदा, प्रियांका शर्मा आणि इतर कलाकार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.
हेही वाचा - Samantha get jalebi treat : समांथा रुथ प्रभूला तिच्या ट्रेनर जुनैद शेखकडून 'या' कारणासाठी मिळाली जलेबी ट्रीट