मुंबई - दक्षिण भारतीय स्टार जोडपे समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी 2 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांच्या विभक्त होण्याची घोषणा केली. त्यानंतर पुढच्याच महिन्यात अल्लू अर्जुनच्या पुष्पा : द राइज मधील ऊं अंटावा या धमाकेदार डान्स गाण्यामुळे समंथा जबरदस्त चर्चेत आली. सध्या ती आगामी शाकुंतलम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सक्रिय आहे. जेव्हा तिच्यात आणि नागा चैतन्यामध्ये विभक्त होण्याची प्रक्रिया सुरू होती तेव्हाच तिला पुष्पामधील हे गाणे ऑफर झाले होते याचा खुलासा केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
विभक्त होताना मिळाले होते पुष्पाचे गाणे - पुष्पा चित्रपटातील ऊं अंटावा हे गाणे जेव्हा २०२१ मध्ये रिलीज झाले तेव्हा समंथा आणि नागा चैतन्या विभक्त झाले होते. अनेकांनी त्यांच्या या विभक्त होण्याला हे गाणे जबाबदार असल्याचे म्हटले होते. मात्र हे गाणे तिने विभक्त झाल्यानंतर साईन केल्याचे सांगितले. पुष्पा या चित्रपटातील हे गाणे वैशिष्ठ्यपूर्ण ठरले होते. हे गाणे तिने करु नये असा सल्लाही तिला काहींनी दिला होता. मात्र समंथाने आपल्या मनाचा आवाज ऐकला आणि गाणे करण्याचा निर्णय घेतला.
आयटम साँग न करण्याचा मिळाला होता सल्ला - शाकुंतलमसाठी प्रमोशनल मुलाखतीत समंथाने ऊं अंटावा करण्यास सहमती देण्याबद्दलचा किस्सा सांगितला. तिने सांगितले की कुटुंबातील सदस्यांनी आणि तिच्या जवळच्या लोकांनी तिला विभक्त झाल्याची घोषणा केल्यानंतर आयटम सॉंग करू नको असे सांगितले होते. तथापि, अभिनेत्री घरी बसून सर्व ट्रोलिंग आणि द्वेष सहन करण्याच्या मनःस्थितीत नव्हती जी नागा चैतन्यपासून विभक्त झाल्यानंतर तिच्या मार्गावर येणार होती. समंथा म्हणाली की तिच्या मैत्रिणी, ज्यांनी तिला नेहमीच आव्हानात्मक गोष्टी करण्यास प्रोत्साहित केले होते ते ऊं अंटवाच्या विरोधात होते. परंतु ती गाणे करण्यावर पूर्ण ठाम होती. समंथा म्हणाली, 'मी काहीही चुकीचे केले नाही. मी ट्रोलिंग, शिवीगाळ आणि तिरस्कार या सर्वांपासून दूर जाण्याची आणि गुन्हा केलेल्या व्यक्तीप्रमाणे हळू हळू परत येण्याची वाट पाहणार नाही. मी तसे करणार नव्हते.'
ऊं अंटावा गाण्याकडे संधी म्हणून समंथाने पाहिले - समंथा म्हणाली की तिला अयशस्वी नातेसंबंधाबद्दल दोषी वाटण्याचे कोणतेही कारण नाही कारण तिने लग्न आणि नात्यासाठी आपले 100% दिले. परंतु ते वर्कआऊट होऊ शकले नाही. 35 वर्षीय समंथाच्या म्हणण्यानुसार, ऊं अंटावा हे गाणे असे काहीतरी एक्सप्लोर करण्याची संधी होती जी तिने आधी केली नव्हते.