ETV Bharat / entertainment

Samantha Ruth Prabhu Remove Tattoo : सामंथा रुथ प्रभूनं बरगड्यांवरचा टॅटू हटविला ; फोटो झाले व्हायरल... - फोटो झाले व्हायरल

Samantha Ruth Prabhu Remove Tattoo : अभिनेत्री सामंथा आणि नागा चैतन्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सामंथानं चैतन्यचं टोपणनाव 'चाय' हे तिच्या बरगड्यांवर गोंदवले होते, हा टॅटू तिन हटविला आहे. सध्या काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सामंथाच्या बरगड्यांवर टॅटू गायब झाला आहे.

Samantha Ruth Prabhu Remove Tattoo
सामंथा रुथ प्रभूनं टॅटू काढले
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2023, 4:58 PM IST

मुंबई - Samantha Ruth Prabhu Remove Tattoo : साऊथ अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत असते. सामंथानं सध्या अभिनयातून ब्रेक घेत आहे. आता अनेक दिवसापासून सामंथा आणि अभिनेता नागा चैतन्यच्या पॅच अपच्या चर्चा या जोरदार सुरू होत्या, मात्र आता या बातम्याना पूर्ण विराम मिळाला आहे. सामंथा आणि नागा चैतन्यचं नात 2021 मध्ये संपल. त्यानंतर दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. सध्या सामंथा-नागाची काही जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, त्यामुळे हे दोघेही पुन्हा पॅच अप करत असल्याचं म्हटलं जात होत. मिळालेल्या माहितीनुसार नागा आणि सामंथा यांच्यात असं काही होणार नाही.

सामंथानं गुलाबी रंगाच्या साडीत फोटो शेअर केले : सामंथा रुथ प्रभूनं चैतन्यचं टोपणनाव 'चाय' हे तिच्या बरगड्यांवर गोंदवलं होतं. दोघेही एकत्र असताना हा टॅटू काढण्यात आला होता. सामंथानं आणखी दोन टॅटू काढले होते. हे टॅटू एप्रिलपर्यंत फोटोंमध्ये दिसत होते. जेव्हा सामंथा प्रियांका चोप्राच्या 'सिटाडेल'च्या प्रीमियरसाठी लंडनला गेली होती, तेव्हा हे टॅटू फोटोंमध्ये दिसत नव्हते. म्हणजे पॅचअपच्या अफवा चुकीच्या आहे. सामंथानं गुलाबी रंगाच्या साडीतील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये सामंथाच्या बरगड्यांवर टॅटू दिसत नाही.

टॅटू खेद व्यक्त केला होता : गेल्या वर्षी, सामंथानं एका सत्रात सूचित केले होते की, तिला टॅटू काढल्याबद्दल पश्चाताप होत आहे. जेव्हा सामंथाला टॅटूबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिनं सांगितलं, 'माझा एक सल्ला आहे, कधीही टॅटू काढू नका'. सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्यनं गोव्यात 2017 मध्ये लग्न केले होते. हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार हा विवाह पार पडला. 2021 मध्ये दोघांनी वेगळे होण्याची घोषणा केली होती, ज्यानंतर त्यांच्या चाहत्यांना आणि मित्र परिवाराला चांगलाच धक्का बसला होता. सामंथा रुथ प्रभूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी विजय देवरकोंडासोबत 'खुशी' या चित्रपटामध्ये दिसली होती.

हेही वाचा :

  1. Nushrratt Bharuccha : युद्धग्रस्त इस्रायलमधून परतल्यानंतर नुसरत भरुचानं पहिला व्हिडिओ केला शेअर ; भारत सरकारचे मानले आभार...
  2. Tiger 3 trailer release date : 'टायगर 3' च्या ट्रेलरची प्रतीक्षा संपली, पोस्टरसह रिलीज तारखेची झाली घोषणा...
  3. Amitabh bachchan birthday : अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्या 'टॉप पाच' चित्रपटाबद्दल जाणून घ्या....

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.