मुंबई: साऊथ अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने काही दिवसांपूर्वी तिच्या आगामी वेब सीरिज सिटाडेलचे सर्बियामध्ये शूटिंग पूर्ण केले आहे. ती वरुण धवन आणि बाकीच्या सहकलाकारांसह सिटाडेलच्या शूटिंगमध्ये व्यस्त असताना, समांथा आणि वरुण सतत सर्बियामधून त्यांचे फोटो शेअर करत होते. दरम्यान आता नुकतेच समांथाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती बेलग्रेडमध्ये फिरताना आणि तेथील रेस्टॉरंटमध्ये फिरताना दिसत आहे. सिटाडेल ही वेब सीरिज या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
समांथा सर्बियात : या फोटोमध्ये समांथाने बेलग्रेडचे सौंदर्य टिपले आहे. यासह, ती तेथील स्थानिक खाद्यपदार्थ, पेये, संगीत आणि स्मारकांना बघत आहे. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना हार्ट इमोजीसह कॅप्शनमध्ये लिहिले, 'बेलग्रेड'. त्यानंतर काही वेळानंतर, समांथाने सर्बियातील एका चर्चमधील फोटो शेअर केले. वरुण आणि समांथा यांची वेब सिरीज 'सिटाडेल' 6 ऑक्टोबर 2023 रोजी रिलीज होणार आहे.
वर्कफ्रंट : सिटाडेल व्यतिरिक्त, समंथा तिच्या आगामी 'खुशी' चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये ती दक्षिण सुपरस्टार विजय देवराकोंडासोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट एक रोमँटिक मनोरंजक आहे जो या वर्षी सप्टेंबरमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. शेवटच्या वेळी सामंथा 'शाकुंतलम'मध्ये अभिनय करताना दिसली होती.
समांथाचे नाते : समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी जानेवारी 2017 मध्ये हैदराबादमध्ये लग्न केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार गोव्यात लग्नगाठ बांधली. या जोडप्याचे नाते फार काळ टिकले नाही आणि सामंथा आणि नागा चैतन्य यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये केवळ लग्नाच्या चार वर्षांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. मीडिया रिपोर्टनुसार, लग्नानंतर सामंथाच्या बोल्ड भूमिकांच्या निवडीवर नागा हा नाखूश होता. तसेच नागाचे वडील नागार्जुन अक्किनेनीने देखील सामंथाने बोल्ड भूमिका निवड करत असल्याबद्दल नाखूश होते. मिळालेल्या माहितीनुसार, सामंथा आणि नागा चैतन्य यांच्यात त्यांच्या चित्रपटांच्या निवडीवरून मतभेद होते. सामंथाने ग्लॅमरस भूमिका आणि फोटोशूटच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयांमुळे त्यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. बराच विचार केल्यानंतर सामंथा आणि नागाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा :