मुंबई - Sam Bahadur film Banda Song : फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित 'सॅम बहादूर' चित्रपटाच्या रिलीजची तारीख जस जशी जवळ येत चाललीय तसं चित्रपटाबद्दलची उत्सुकता ताणत चाललीय. आता या चित्रपटातील 'बंदा' हे गाणं रिलीज करण्यात आलंय. गीतकार गुलजार यांनी लिहिलेलं हे सुंदर गाणं शंकर महादेव यांनी गायलंय आणि शंकर एहसान लॉयनी संगीतबद्ध केलंय.
या गाण्यात सॅम माणेकशॉ यांचं देशाप्रती असलेलं अतुट समर्पण दाखवण्यात आलंय. सैनिकांना प्रेरणा देणारा, लढण्यासाठी महत्त्वकांक्षी, सदैव तत्पर असलेल्या निडर फिल्म मार्शल यांची कहाणी गाण्यात मांडण्यात आलीय. यामध्ये सॅम माणेकशॉंच्या भूमिकेत असलेला विकी कौशल भूमिकेत समरस झाल्याचं दिसतंय. सॅम माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली 1971 च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात भारतीय सैन्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात केल्याची झलकही या म्यूझिक व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलीय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर सेट केलेल्या 'सॅम बहादूर' या चित्रपटात फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांनी बांगलादेशच्या मुक्तीसाठी भारतीय सैन्याचे नेतृत्व कसे केले याची कथा मांडण्यात आलीय. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशल, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, नीरज काबी, एडवर्ड सोनेनब्लिक आणि झीशान अय्युब यांच्या भूमिका आहेत.
विकी कौशल सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतला आहे. अलीकडेच त्यानं लखनौमध्ये गोरखा सैनिकांसोबत खुकुरी नृत्य करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. खुकुरी नृत्य हा पारंपारिक लोकनृत्य परफॉर्मन्स नमुना आहे. गुरखा सैनिकांनी समारंभपूर्वक परेड, सांस्कृतिक कार्यक्रम आणि गुरखा ब्रिगेडच्या बँडच्या सादरीकरणासह इतर कार्यक्रमांमध्ये खुकुरी नृत्य सादर केलं आहे. यामध्ये इतर सैनिकांच्या साथीनं विकी कौशल उत्तम स्टेप्स करताना दिसतोय.
RSVP मूव्हीज या बॅनरखाली रॉनी स्क्रूवाला निर्मित सॅम बहादूर हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. हा भारतातील पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित चरित्रात्मक युद्धपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलंय.
हेही वाचा -