मुंबई - मेघना गुलजार दिग्दर्शित 'सॅम बहादूर' हा बहुप्रतिक्षित चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शणासाठी सज्ज झालाय. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेता विकी कौशल, सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा सुरू असून दिल्लीत एक भव्य कार्यक्रमात ट्रेलर लॉन्च होणार आहे. या ट्रेलर लाँच इव्हेंटसाठी 'सॅम बहादूर'ची टीम नवी दिल्लीत दाखल झाली आहे. या इव्हेन्टला दिल्लीकरांनी हजर राहवं यासाठी विकी आणि सान्या मल्होत्रानं इन्स्टाग्रामवर टीझ केलंय.
'सॅम बहादूर' चित्रपटाचा ट्रेलर आज 7 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार असून, ग्रँड लॉन्च इव्हेंटसाठी टीम नवी दिल्लीत दाखल झाली आहे. विकी कौशलनं मेघना गुलजारसोबतचा स्वतःचा फोटो पोस्ट करत त्याच्या आगमनाविषयी त्याच्या चाहत्यांना अपडेट दिलीय. फोटोमध्ये मेघना विकीच्या खांद्यावर डोके ठेवलेली दिसतोय.
सान्या मल्होत्रानं एका मजेदार कमेंटसह इंस्टाग्राम स्टोरीजवर तिच्या आगमनाची वर्दी चाहत्यांना दिलीय. तिनं लिहिलंय, 'दिल्ली आ गये है, गुगल मॅप पर अंधा विश्वास करते हुए.' याला विकीने गंमतीने उत्तर दिले, 'बस मेट्रो चालवू नका... नंतर भेटू, एस!'
युद्धपट असलेला 'सॅम बहादूर' चित्रपटाच्या निर्मात्यांनी ट्रेलरच्या रिलीजच्या तारखेची घोषणा करण्यासाठी नायक विकी कौशलचे नाट्यमय नवीन पोस्टर रिलीज केलं. या चित्रपटात विकी सॅम माणेकशॉची भूमिका साकारतोय. सैनिकांना प्रेरणा देण्यासाठी, त्यांच्या अखंड निष्ठा आणि राष्ट्र सेवेचे आवाहन करताना पोस्टरमध्ये सॅम माणेकशॉच्या भूमिकेतील विकी दिसत आहे. विकीने इंस्टाग्रामवर पोस्टर पोस्ट करत म्हटले आहे की, 'ही कहाणी त्या व्यक्तीची आहे ज्यानं आपले जीवन भारतीय सैन्यासाठी, देशासाठी समर्पित केलं. उद्या ट्रेलर आऊट होत आहे!'
'सॅम बहादूर' हा चित्रपट 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय लष्कराचे प्रमुख सेनापती आणि फील्ड मार्शलची पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय सैन्य कमांडर सॅम माणेकशॉ यांचा चरित्रपट आहे. यात सान्या मल्होत्रा विकी कौशलच्या पत्नीच्या भूमिकेत आहे, तर फातिमा सना शेखनं माजी पंतप्रधान इंदिरा गांधीची भूमिका केली आहे.
हेही वाचा -
3. Rashmika Mandanna : मॉर्फ व्हिडिओवर रश्मिका म्हणाली, तंत्रज्ञानाचा गैरवापर भयानक