मुंबई - Salman Khans birthday : बुधवारी 27 डिसेंबर रोजी सलमान खान आपला 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी सलमानचे चाहते गॅलक्सी अपार्टमेंटच्या बाहेर मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले होते. मंगळवारी रात्रीपासूनच मुंबई आणि शहराबाहेरील चाहत्यांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांच्या हातात पुष्पगुच्छांसह भेटवस्तुही होत्या. चाहत्यांच्या हातामध्ये मोठे पोस्टर्स आणि बॅनरही दिसत होते.
-
#WATCH | Maharashtra: Fans of Salman Khan gather outside his residence in Mumbai, as the actor celebrates his 58th birthday. pic.twitter.com/kr06nR822T
— ANI (@ANI) December 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Maharashtra: Fans of Salman Khan gather outside his residence in Mumbai, as the actor celebrates his 58th birthday. pic.twitter.com/kr06nR822T
— ANI (@ANI) December 26, 2023#WATCH | Maharashtra: Fans of Salman Khan gather outside his residence in Mumbai, as the actor celebrates his 58th birthday. pic.twitter.com/kr06nR822T
— ANI (@ANI) December 26, 2023
सलमानच्या वाढदिवसानिमित्त खान कुटुंबीयांनी अर्पिता खान शर्माच्या मुंबईतील घरी खास पार्टीचे आयोजन केले होते. याच दिवशी सलमानची भाची आयतचाही वाढदिवस आहे. मामा भाचीने मिळून यंदाचा खास वाढदिवस साजरा केला. या दोघांनी मिळून कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत एका जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात वाढदिवसानिमित्त केक कापला. सलमान खानच्या मध्यरात्रीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची झलक दाखवणारे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. व्हिडिओंमध्ये, नेहमीप्रमाणेच हँडसम दिसत असलेल्या 'दबंग' सलमानने निळ्या जीन्ससह काळा शर्ट घातला होता.
वडील आयुष शर्मा आणि आई अर्पिता खान यांच्यासोबत आयतचा मोठा केक कापताना सलमान खान त्याच्या भाचीसाठी वाढदिवसाचे गाणे गाताना दिसला. या पार्टीमध्ये लुलिया वंतूर, अरबाज खान, अरबाज खानचा मुलगा अरहान खान, सोहेल खान, हेलन, अलविरा खान अग्निहोत्री, आयुष शर्मा, अर्पिता खान शर्मा, बॉबी देओल आणि इतर उपस्थित होते.
मित्र आणि कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी सलमान बुधवारी पहाटे मुंबईला परतला. त्याला मुंबई विमानतळावर पापाराझींकडून फोटोत कैद करण्यात आले होते. मंगळवारी सलमान नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिसला होता.
दरम्यान, चित्रपटाच्या आघाडीवर, सलमान अलीकडेच 'टायगर 3' या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात दिसला होता. मनीष शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांच्याही प्रमुख भूमिका होत्या.
'टायगर 3' च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल खास बोलतांना सलमानने एएनआयला सांगितले की, "दिवाळीची वेळ होती आणि विश्वचषक चालू होता आणि सर्वांची उत्सुकता त्यात होती, पण तरीही आम्हाला मिळालेले यश अप्रतिम आहेत... आम्ही याबद्दल खूप कृतज्ञ आणि आनंदी आहोत." 'टायगर 3' हा टायगर फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे आणि 'वॉर' आणि 'पठान' सारख्या यशराज फिल्म्स स्पाय युनिव्हर्सचा तो एक भाग आहे. सलमानने अद्याप त्याच्या पुढील प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही.
हेही वाचा -