ETV Bharat / entertainment

Salman khan : सलमान खाननं भाची अलीजेह अग्निहोत्रीसाठी लिहिली खास पोस्ट; वाचा... - salman khan

Salman khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खाननं अलीकडेच त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये भाईजाननं भाची अलीजेह अग्निहोत्रीला सल्ला दिला आहे.

Salman khan
सलमान खान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2023, 12:31 PM IST

मुंबई - Salman khan : सलमान खान हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे. दबंग खान हा लाखो लोकांच्या मनावर राज्य करतो. 'वॉन्टेड', तेरे नाम 'भारत', 'सुलतान', 'एक था टायगर', 'प्रेम रतन धन पायो', यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं आहेत. सलमाननं त्याची बहीण अलविरा खान अग्निहोत्रीची मुलगी अलीजेह अग्निहोत्रीसाठी इंस्टाग्रामवर एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं सुंदर कॅप्शन देऊन आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. सलमान खाननं इंस्टाग्राम हँडलवर अलीजेह अग्निहोत्रीसोबतचा एक थ्रोबॅक फोटो चाहत्यासोबत शेअर केला आहे.

सलमान खाननं इंस्टाग्रामवर शेअर केली पोस्ट : या फोटोत दोघेही खूप क्यूट दिसत आहेत. या फोटोमध्ये सलमान खाननं आपल्या भाचीला कडेवर घेतले असून दोघेही निरागसपणे एकमेकांकडे पाहत आहेत. फोटो शेअर करताना सलमाननं लिहलं, 'मामूवर एक उपकार कर. तुम्ही जे काही करशील ते मनापासून आणि मेहनतीन कर! नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात सरळ जा आणि उजवीकडे वळा. फक्त स्वतःशीच स्पर्धा करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, एकदा तुम्ही वचनबद्धता केली की, काकांचेही ऐकू नका. सलमाननं आपल्या भाचीला तिच्या आयुष्यात कठोर परिश्रम करण्याची आणि नेहमी स्वतःशी स्पर्धा करण्याची विनंती केली आहे. सलमानची ही पोस्ट शेअर होताच, त्याचे मित्र आणि चाहते कमेंट विभागात प्रतिक्रिया देत आहेत.

अलीझेह अग्निहोत्रीनं मानले आभार : सलमान खानच्या या पोस्टवर अलीजेहनं प्रतिक्रिया दिली. तिनं लिहिलं, 'धन्यवाद मामू.' संगीता बिजलानी देखील लिहिलं, 'खूप सुंदर शब्द.' दरम्यान, फलक नाज, प्रियांका चहर चौधरी, ताहिर शब्बीर यांनीही या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहेत. सलमान खानची भाची अलीजेह अग्निहोत्री ही अवनीश बडजात्याच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अवनीश हा चित्रपट निर्माता सूरज बडजात्या यांचा मुलगा आहे. सध्या सलमानची भाची ही डान्सचं प्रशिक्षण घेत आहे आणि ती लवकरच अभिनेत्री होणार आहे.

हेही वाचा :

  1. Happy Birthday Nick Jonas: प्रियांका चोप्रानं पती निक जोनासला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत खास पोस्ट केली शेअर...
  2. Parineeti chopra : परिणीती चोप्रानं काढला पापाराझीवर राग ; व्हिडिओ व्हायरल...
  3. Akshay kumar and Rohit shetty : अक्षय कुमार दिसणार रोहित शेट्टीच्या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.