ETV Bharat / entertainment

फार्महाऊसवर घुसखोरीनंतर विमानतळावर कडक बंदोबस्तात दिसला सलमान खान - Salman Khan

सलमान खानच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर तीन संशयितांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्या पार्श्वभूमीवर त्याच्या सुरक्षा व्यवस्थेत सतर्कता बाळगली जात आहे. मुंबई विमानतळावर तो कडक सुरक्षा व्यवस्थित वावरताना दिसला.

Salman Khan spotted at Mumbai airport
सलमान विमानतळावर स्पॉट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 9, 2024, 12:50 PM IST

मुंबई - सुपरस्टार सलमान खान मंगळवारी मुंबईतील विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्थेत दिसला. कॅज्युअल पोशाखात - काळ्या पँटसह तपकिरी शर्ट घालून सलमान येथील कलिना विमानतळावरून बाहेर पडताना दिसला. यावेळी सलमानने ब्लॅक कॅपने त्याचा लूक ऍक्सेसराइज केला होता. तो त्याच्या कारकडे जाण्यापूर्वी विमानतळाबाहेर उभे असलेल्या पापाराझींनी त्याला फोटोसाठी हाक दिली. 'भाई भाई', असे ओरडणाऱ्या फोटोग्राफर्सना हात दाखवत तो त्याच्या कारमध्ये बसला. त्याच्या मागे सुरक्षा रक्षकांसह बॉडीगार्ड शेरा दिसत होता. त्याची कार पुढे जाताच पापाराझींनी त्याच्या कारला गराडा घातला होता. मागोमाग पोलीस जवान आणि इतर सुरक्षा रक्षकांच्या गाड्या यांचा ताफा जाताना दिसला.

नुकतेच पनवेल येथील सलमान खानच्या फार्महाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हे तरुण झाडाच्या मदतीने कंपाउंडची भिंत ओलांडून घरात शिरायचा प्रयत्न करत होते. सलमानच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडून विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले व त्यांनी दोघांची चौकशी सुरू केली. त्यांच्याकडे असलेली ओळखपत्रेही बनावट निघाल्याचे मसजते. यापार्श्वभूमीवर सलमानच्या सुरक्षा व्यवस्थेकडे गंभीरपणे पाहिलं जातं आहे. यापूर्वी सलमानला जीवे मारण्याच्या अनेक धमक्या मिळाल्या आहेत. सरकारनेही त्याच्या सुरक्षेसाठी काही जवान तैनात केले आहेत.

कामाच्या आघाडीवर सलमान 'टायगर 3' मध्ये झळकला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. मनीश शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 466.63 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटात सलमानने कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीसोबत स्क्रीन स्पेस शेअर केली होती. हा चित्रपट सध्या प्राइम व्हिडिओवर प्रसारित होत आहे.

सलमान त्याच्या 'बिग बॉस' होस्टिंगमुळेही चर्चेत आहे. 'बिग बॉस 17' च्या अलीकडील भागामध्ये, सलमानने एपिसोडच्या निर्मात्यांना नम्रपणे विनंती केली की फिनालेनंतर बिग बॉसच्या घरात चाहत्यांना राहण्यासाठी विशेष व्यवस्था करावी. अनेक चाहत्यांना बिग बॉसचं घर पाहायचं आहे. अनेकांना तर या घरात राहायचंही आहे. बिग बॉस संपल्यानंतर चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकते आणि त्यासाठी सलमानने पुढाकार घेतला आहे. येणाऱ्या काळातच यावरचा पडदा दूर होईल.

हेही वाचा -

  1. 'सनफ्लॉवर 2'मध्ये सुनील ग्रोव्हरसोबत झळकणार 'द केरल स्टोरी' फेम अदा शर्मा
  2. बिग बॉसच्या घरात अभिषेक कुमारची रिएनट्री, कृतघ्न असल्याची स्पर्धकांकडून टीका
  3. 'सालार' सक्सेस पार्टीत प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन यांनी दिग्दर्शक प्रशांत नीलसोबत कापला केक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.