ETV Bharat / entertainment

Jawan Prevue : शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाच्या प्रीव्ह्यूवर सलमान खानने दिली प्रतिक्रिया... - जवान प्रीव्ह्यू

शाहरुख खानचा आगामी 'जवान' या चित्रपटाचा प्रीव्ह्यू सोमवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान आता बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाचा प्रीव्ह्यू त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

Jawan Prevue
जवान प्रीव्ह्यू
author img

By

Published : Jul 12, 2023, 12:02 PM IST

मुंबई: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर आगामी चित्रपट 'जवान'च्या प्रीव्ह्यूची पोस्ट करून सिद्ध केले की तो शाहरुख खानचा प्रचंड चाहता आहे. यासोबतच त्याने पहिल्या दिवशी 'जवान' चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पाहण्याचे आश्वासनही दिले आहे. 'जवान' या चित्रपटाचा प्रीव्ह्यू हा प्रेक्षकांना फार पसंतीला पडला आहे. या चित्रपटाचा प्रीव्ह्यू प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा होताना दिसत आहे.

सलमान खान पाहणार 'जवान' चित्रपट : मंगळवारी सलमान खानने शाहरुखच्या आगामी 'जवान' चित्रपटाचे प्रीव्ह्यू शेअर केला आहे. त्यानंतर त्याने या प्रीव्ह्यूच्या कॅप्शनमध्ये लिहले, 'पठाण जवान बन गया. उत्कृष्ट ट्रेलर. खूप आवडला. आता हा एक चित्रपट आहे जो आपण फक्त थिएटरमध्येच पाहिला पाहिजे. मला खात्री आहे की मी ते पहिल्याच दिवशी बघेन. मजा आली.' सलमान खानच्या या पोस्टवर तब्बूनेही प्रतिक्रिया दिली आहे. तिने कमेंट करत टाळ्या वाजवणारा इमोजी पोस्ट केला आहे. खरचं या चित्रपटाचा ट्रेलर फार उत्कृष्ट आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला फार लाईक आणि हिटस् मिळत आहे.

सलमान खान आणि शाहरुख खानची मैत्री : नव्वदच्या दशकाच्यापासूनच सलमान खान आणि शाहरुख खान खूप जवळचे मित्र होते, तेव्हापासून या दोघांमध्ये नाते आंबट-गोड आहे. दोघेही १९९४ मध्ये आलेला चित्रपट 'अंदाज अपना अपना'मध्ये एकत्र दिसले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केले होते. हा एक विनोदी चित्रपट होता. आजही या चित्रपटाला फार जास्त पसंत केले जाते. याशिवाय १९९५ मध्ये आलेल्या 'करण अर्जुन' चित्रपटात पुन्हा एकदा त्यांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश रोशनने केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिवर जबरदस्त कमाई केली होती. हा चित्रपट पुनर्जन्मवर आधारित होता.

'जवान' चित्रपटाबद्दल : अ‍ॅटली दिग्दर्शित 'जवान' या अ‍ॅक्शन चित्रपटात शाहरुख हा बाप आणि मुलाची दुहेरी भूमिका रूपेरी पडद्यावर साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात नयनतारा, दीपिका पदुकोण, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोग्रा आणि प्रियामणी यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटातमध्ये संजय दत्त आणि थलपथी विजय हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. शाहरुख आणि गौरी खान यांच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटची निर्मित असलेला 'जवान' हा चित्रपट ७ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. Sidharth Malhotra : सिद्धार्थ मल्होत्राने पत्नी कियारा अडवाणीला म्हटले सर्वात मौल्यवान खजिना...
  2. SS Rajamouli temple visits : परदेशात राहून कंटाळलेल्या राजामौलींनी केले तामिळनाडूत अध्यात्मिक पर्यटन
  3. Alia Bhatt treats fans with BTS footage : आलिया भट्टने मातृत्व स्वीकारल्यानंतर 'हे' गाणे केले होते शूट....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.