ETV Bharat / entertainment

सलमान खाननं भाची आयतसोबत साजरा केला वाढदिवस , फोटो व्हायरल - सलमान खान

Salman Khan and his niece birthday: अभिनेता सलमान खान आणि त्याची भाची आयत आज 27 डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. आता वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Salman Khan and his niece birthday
सलमान खान आणि त्याच्या भाचीचा वाढदिवस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 27, 2023, 10:45 AM IST

Updated : Dec 27, 2023, 1:07 PM IST

मुंबई - Salman Khan and his niece birthday: अभिनेता सलमान खान आज, 27 डिसेंबरला त्याचा 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. याशिवाय याच दिवशी भाईजानची भाची, बहीण अर्पिता आणि आयुषची मुलगी आयतचाही वाढदिवस आहे. आता सध्या सोशल मीडियावर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत. दरम्यान या खास प्रसंगी अभिनता बॉबी देओलही उपस्थित होता. सोशल मीडियावर सलमान खानचे फोटो व्हायरल होताच अनेकजण त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. सलमान खाननं त्याच्या 58व्या वाढदिवसानिमित्त भाची आयतसोबत केक कापून आपला खास दिवस साजरा केला.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल : या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये सलमान खान आणि त्याची भाची बहीण अर्पिता खान, आयुष शर्मा, अरबाज खान, अरहान खान, हेलन, अलविरा खान अग्निहोत्री, युलिया वंतूर, बॉबी देओल, साजिद, कुटुंबातील सदस्य आणि बरेच मित्र उपस्थित होते. एका व्हिडिओमध्ये सलमान खान, हेलन, अर्पिता, आयुष हे आयतच्या केक कटिंगच्या वेळी वाढदिवसाचे गाणं गाताना दिसत आहेत. याशिवाय दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये अर्पिता आयतला सलमानला केक खायला सांगताना दिसत आहे. या खास प्रसंगी अर्पितानं 'भाईजान' आणि आयतला केक खाऊ घातला. सलमान खानच्या फोटो आणि व्हिडिओला अनेकजण पसंत करत आहेत.

बॉबी देओलनं दिल्या सलमान खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा : बॉबी देओलही सलमान खान आणि त्याच्या भाचीच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजर होता. त्यानं या खास प्रसंगाचे फोटो त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोवर त्यानं कॅप्शन देत लिहिलं, 'मामू मी तुझ्यावर प्रेम करतो.' शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये बॉबी देओल सेल्फीमध्ये सलमानला किस करताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये दोघेही हसत हसत कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसत आहेत. बॉबीनं शेअर केलेल्या फोटोला अभिनेता सनी देओलनं हार्ट इमोजी शेअर केला असून या दोघांवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. संगीतकार साजिदनं देखील त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पार्टीतील काही व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये साजिद हा सलमान खानसोबत सेल्फीमध्ये दिसत आहे. याशिवाय त्यानं बॉबी देओलसोबतचा एक फोटो देखील इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे.

हेही वाचा :

  1. प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या मैत्रीचं प्रतिक असलेलं सालारमधील थीम सॉंग 'यारा' गाणं लॉन्च
  2. पिलीभीतमध्ये घराच्या भिंतीवर रात्रभर बसला वाघ, वनविभागाचे पथक दाखल तर शेतकऱ्यांवर दहशत
  3. शाहरुख खान-राजकुमार हिराणीच्या 'डंकी'चा सोमवारीही बॉक्स ऑफिसवर डंका

Last Updated : Dec 27, 2023, 1:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.