ETV Bharat / entertainment

Tiger vs Pathaan : 'टायगर व्हर्सेस पठाण'साठी सलमान खान सज्ज, दोन गुप्तहेरात होणार संघर्ष - दिग्दर्शक मनीश शर्मा

Tiger vs Pathaan : 'टायगर व्हर्सेस पठाण' या आगामी चित्रपटात सलमान खान आणि शाहरुख खान यांचं पुनर्मिलन होणार आहे. अलिकडेच सलमाननं या चित्रपटाबद्दल सूतोवाच केलं. दोन जबरदस्त गुप्तहेरातील संघर्ष या चित्रपटातून पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Tiger vs Pathaan
टायगर व्हर्सेस पठाण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 10, 2023, 3:34 PM IST

मुंबई - Tiger vs Pathaan : सलमान खानचा 'टायगर 3' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. रिलीजला दोन दिवस शिल्लक राहिलेलं असताना त्यानं या चित्रपटाच्या शुटिंगमधील आव्हानात्मक आणि आनंददायी गोष्टींबद्दल भाष्य केलं. त्यासोबतच 'टायर व्हर्सेस पठाण' या आगामी चित्रपटाच्या शुटिंगबद्दलही सूतोवाच केलंय.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'टायगर 3' शूटच्या सर्वात आव्हानात्मक भागाबद्दल विचारले असता, सलमान म्हणाला की, बाईकचा पाठलाग करणारा सीन सर्वात कठीण होता कारण त्यासाठी मोठ्या प्रमाणात शूटिंग करणं आवश्यक होतं. दिग्दर्शक मनीश शर्मानं याबाबत तपशीलवार चर्चा केली आणि त्यानं त्याला हवा असलेला सीन साध्य करण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले.

'लेके प्रभु का नाम' या गाण्याच्या शुटिंगमध्ये खूप मजा आल्याचं सलमाननं सांगितलं. या गाण्याचं शुटिग तुर्कस्तानातील कॅपाडोशिया येथे पार पडलं होतं. सलमान म्हणाला की, त्याची सह-कलाकार कतरिना कैफ ही चार्टबस्टर आहे आणि तिनं जगभरातील प्रेक्षकांचं उत्तम मनोरंजन केलंय. 'लेके प्रभु का नाम' या गाण्यामुळं त्यात भर पडल्याचं सलमाननं सांगितलं.

'टायगर व्हर्सेस पठाण' बद्दल बोलताना सलमान म्हणाला, "टायगर नेहमीच तयार असतो त्यामुळे त्याच्याबाबतीत जेव्हा जेव्हा गोष्टी लॉक केल्या जातात - मी तिथे असतो!" या चित्रपटात सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यात एकजबरदस्त संघर्ष पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार असल्याचं यापूर्वीच्या बातम्यातून प्रसिद्ध झालंय.

'टायगर व्हर्सेस पठाण' चित्रपटाची टीम दिवाळीत 'टायगर 3' रिलीज झाल्यानंतर या वर्षी नोव्हेंबरमध्ये शुटिंगच्या पूर्व तयारीला सुरुवात करेल. मार्च 2024 मध्ये प्रत्यक्ष शुटिंगला सुरू होण्यापूर्वी हा चित्रपट पाच महिन्यांच्या प्री-प्रॉडक्शनच्या टप्प्यातून जाईल.

दरम्यान, 'टायगर 3' हा चित्रपट दिवाळीच्या निमित्तानं 12 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवण्यात चित्रपटाच्या टीमला चांगलं यश आल्याचं दिसतंय. या चित्रपटाच्या आगाऊ तिकीट विक्रीलाही उत्सफुर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय. या चित्रपटाच्या सुरुवातीला सलमान खानची होणारी पडद्यावरील एन्ट्री चित्तरारक असणार असल्याचं निर्मात्यांनी भाईजानच्या चाहत्यांना कळवलंय. यासाठी मोठ्या प्रमाणावर बजेटही खर्च झाल्याचं समजतंय. सलमानच्या एन्ट्रीचा सीन 10 मिनीटांचा अ‍ॅक्शन सीन असणार आहे.

हेही वाचा -

1. Parineeti Chopra Maldives Vacation : परिणीती चोप्रानं मालदीवमधील थ्रोबॅक फोटो केले शेअर; पाहा फोटो

2. Javed Akhatar About Ramayan : 'रामायण' ही आपली 'सांस्कृतिक मालमत्ता' असल्याचं जावेद अख्तरांचं रोखठोक मत

3. Anushka Sharma Viral Video : अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई होणार? विराटसोबतचा व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.