मुंबई - Salaar song Yaraa out: होंबळे फिल्म्सची नवी निर्मिती असलेल्या 'सालार भाग 1: सीझफायर' या प्रशांत नील दिग्दर्शित, चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे निर्विवादपणे एक भव्य यश जगभर पाहायला मिळत आहे. हा चित्रपट चाहत्यांइतकाच प्रेक्षकांनाही आवडला आहे. 'सालार' चित्रपटाच्या निर्मात्यांनी आता 'यारा' नावाचे अत्यंत अपेक्षित असलेले मैत्रीचे थीम सॉन्ग रिलीज केले आहे. हे गाणं चित्रपटाच्या कथानकाला साजेसं आणि पूरक आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
या मधुर गाण्याने थिएटरमधील चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे गाणं हिट झालं आहे असंही म्हणता येईल. या गाण्यातून खानसाराच्या दुनियेची झलक आणि मैत्रीसोबत असलेल्या गहन भावनांचे दर्शन घडवते. हे गाणं हिंदीसह इतर भाषातूनही रिलीज करण्यात आलं आहे. यामध्ये विनारा (तेलुगु), गेल्या (कन्नड), यारा (हिंदी), अरिवाई (तमिळ), अरावाइ (मल्याळम) या भाषेतील व्हिडिओ गाणे आता बाहेर आले आहे.
'सालार: भाग 1 सीझफायर'मध्ये प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन आणि जगपती बाबू या कलाकारांचा समावेश आहे. प्रशांत नील दिग्दर्शित आणि विजय किरागांडूर निर्मित हा सिनेमाचा 2 तास 55 मिनिटे इतका रनटाइम आहे. यात असलेल्या हिंसाचाराच्या दृष्यामुळे चित्रपटाला सेन्सॉरने 'ए' सर्टिफिकेट दिले आहे.
या चित्रपटाने विविध ब्लॉकबस्टर्सचे रेकॉर्ड मागे टाकत बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. रुपेरी पडद्यावर येण्याच्या क्षणापासून, प्रेक्षक प्रभास आणि पृथ्वीराज यांनी उत्कृष्टपणे चित्रित केलेल्या मैत्रीच्या या आकर्षक कथेची प्रशंसा करत आहेत. 'सालार भाग 1 सीझफायर'ने जागतिक यश मिळवून, आता या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी मंच तयार केला आहे, ज्याचे नाव 'सालार भाग 2: शौर्यंगा पर्वम' असे असणार आहे.
सालारची बॉक्स ऑफिसवर कमाई - प्रशांत नील दिग्दर्शित 'सालार' चित्रपट शुक्रवारी तेलुगू, कन्नड, तामिळ, मल्याळम आणि हिंदीमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या मते, हा चित्रपट सोमवारी भारतात 250 कोटी क्लबमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी झाला. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी 90.7 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 56.35 कोटींची कमाई केली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी 62.05 कोटी रुपये कमावले. त्याच्या चौथ्या दिवशी आणि पहिल्या सोमवारी 'सालार'ने भारतात सर्व भाषांसाठी अंदाजे 42.50 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाने आतापर्यंत रु. 251.60 कोटीची कमाई केली आहे.