मुंबई - Salaar box office collection day 15 : प्रभास स्टारर 'सालार' नवीन वर्षातही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटाचे विक्रम मोडले आहेत. 'सालार' चित्रपट प्रेक्षकांचे उत्तम मनोरंजन करत आहे. हा चित्रपट देशांतर्गत 400 कोटींच्या क्लबकडे वाटचाल करत आहे. 'सालार' चित्रपट बॉक्स ऑफिसवर 22 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट रिलीज होऊन 15 दिवस झाले आहेत. या चित्रपटात प्रभाससोबत पृथ्वीराज सुकुमारन, टिनू आनंद, जगपती बाबू आणि श्रिया रेड्डी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
बॉक्स ऑफिस कमाई : प्रभासनं 'बाहुबली' नंतर अनेक बिग बजेट चित्रपट केले, परंतु त्याचे सर्व फ्लॉप ठरले. 'साहो', 'राधे श्याम' आणि 'आदिपुरुष' कडून प्रभासला खूप अपेक्षा होत्या, पण हे चित्रपट अपेक्षेप्रमाणे काम करू शकले नाहीत. दरम्यान 'सालार' चित्रपटाद्वारे त्यानं रुपेरी पडद्यावर जबरदस्त कम बॅक केला आहे. 'सालार'च्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार प्रभास स्टारर 'सालार'नं पहिल्या दिवशी 90.7 कोटी, दुसऱ्या दिवशी 56.35 कोटी, तिसऱ्या दिवशी 62.05 कोटी, चौथ्या दिवशी 46.3 कोटी, पाचव्या दिवशी 24.9 कोटी, सहाव्या दिवशी 15.6 कोटी, सातव्या दिवशी 12.1 कोटी, आठव्या दिवशी 9.62 कोटी , नवव्या दिवशी 12.55 कोटी, दहाव्या दिवशी 14.50 कोटी, अकराव्या दिवशी 16.6 कोटी, बाराव्या दिवशी 6.45 कोटी, तेराव्या दिवशी 5.18 कोटी, चौदाव्या दिवशी 4.6 कोटी आणि पंधराव्या दिवशी 3.65 कोटीची कमाई केली आहे. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 381.75 कोटीची कमाई झाली आहे. जगभरात या चित्रपटानं 578.55 कोटीचा व्यवसाय केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'सालार'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
पहिला शुक्रवार पहिला दिवस: 90.7 कोटी
पहिला शनिवार दुसरा दिवस: 56.35 कोटी
पहिला रविवार तिसरा दिवस: 62.05 कोटी
पहिला सोमवार चौथा दिवस: 46.3 कोटी
पहिला मंगळवार पाचवा दिवस: 24.9 कोटी
पहिला बुधवार सहावा दिवस: 15.6 कोटी
पहिला गुरुवार सातवा दिवस: 12. 1 कोटी
दुसरा शुक्रवार आठवा दिवस: 9.62 कोटी
दुसरा शनिवार नववा दिवस: 12.55 कोटी
दुसरा रविवार दहावा दिवस: 14.50 कोटी
दुसरा सोमवार अकरावा दिवस : 16.6 कोटी
दुसरा मंगळवार बारावा दिवस : 6.45 कोटी
दुसरा बुधवार तेरावा दिवस : 5.18 कोटी
दुसरा गुरुवार चौदाव्या दिवस : 4.6 कोटी
तिसरा शुक्रवार पंधराव्या दिवस : 3. 65 कोटी
एकूण कमाई : 381.75 कोटी रुपये
हेही वाचा :