ETV Bharat / entertainment

Aditya Roy Kapur and Ananya Panday : 'लव्हबर्ड्स' परतले,अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर मुंबई विमातळावर स्पॉट... - मुंबई विमातळावर स्पॉट

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कथित नात्यामुळे चर्चेत आहेत. आता नुकतेच हे जोडपे मुंबई विमातळावर स्पॉट झाले आहे, त्यामुळे या जोडप्याबद्दल आणखी चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

Aditya Roy Kapur and Ananya Panday
अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर
author img

By

Published : Jul 20, 2023, 4:47 PM IST

मुंबई : अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या कथित नात्यामुळे चर्चेत आहेत. या जोडप्याच्या डेटिंगच्या अफवा करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोदरम्यान सुरू झाल्या होत्या. अनन्या आणि आदित्यने जून २०२३ मध्ये त्यांच्या युरोप व्हेकेशनमधून एकामागून एक रोमँटिक फोटोंची झलक देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. स्पेनमधील एका संगीत कार्यक्रमाचा आनंद घेण्यापासून ते एकत्र स्कूटरवर जाण्यापर्यंत आणि एकमेकांना मिठी मारण्यापर्यंत, कथित असलेल्या जोडप्याच्या झलकांनी खरोखरच अनेकांची मने जिंकली आहेत. आता , युरोपमध्ये चांगला वेळ घालवल्यानंतर मुंबईत परतताना लव्हबर्ड्स लाजत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर विमानतळावर दिसले : अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर १९ जुलै २०२३ रोजी त्यांच्या रोमँटिक युरोपियन सुट्टीवरून परतल्यानंतर मुंबई विमानतळावर दिसले. कथित जोडपे एकापाठोपाठ विमानतळावरून बाहेर पडताना दिसले.

आदित्य आणि अनन्याचे लूक : अनन्याने यावेळी ग्रे रंगाचा टी-शर्ट आणि बेल बॉटम परिधान केली असून तिने खांद्यावर एक बॅग घेतली होती. या लूकमध्ये ती फार सुंदर दिसत आहे. याशिवाय काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये आदित्य फार देखणा दिसत होता. तसेच आदित्यने पाठेवर एक बॅग देखील घेतली होती. या लूक आणखी खास बनविण्यासाठी त्याने काळी टोपी घातली. याशिवाय त्याने एक शर्ट त्याच्या कमरेजवळ बांधले होते.

जेव्हा आदित्य-अनन्याने पोर्तुगालच्या रस्त्यावर इलेक्ट्रिक स्कूटर ट्राय केली : पापाराझीने आदित्य आणि अनन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला ज्यात पोर्तुगालच्या रस्त्यावर अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरचा इलेक्ट्रिक स्कूटर चालवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये आदित्य काळ्या पँटसह निळ्या रंगाच्या स्वेटशर्टमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तसेच अनन्या पिंक कलरच्या टॉप आणि व्हाईट कलरच्या मिनी स्कर्टमध्ये या व्हिडिओत दिसत आहे. हे,जोडपे एकत्र त्यांचा क्वालिटी टाइम एन्जॉय करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अनन्या स्कूटर चालवताना तोल गमावताना दिसली, तेव्हा आदित्य मागे वळून पाहतो आणि थांबतो.

वर्कफ्रंट : आदित्य रॉय कपूर अखेरचा 'नाईट मॅनेजर सीझन २' मध्ये दिसला होता. ज्यामध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय तो अनुराग बासूच्या आगामी 'मेट्रो इन दिनो' या अँथॉलॉजी चित्रपटात दिसणार आहे. दुसरीकडे, अनन्या ही आयुष्मान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल २' मध्ये दिसणार आहे. याव्यतिरिक्त ती विक्रमादित्य मोटवानेच्या अनटाइटल्ड थ्रिलर आणि 'खो गये हम कहाँ' मध्येही मुख्य भूमिकेत आहे.

हेही वाचा :

  1. BPBD Box Office Collection Day 20 : 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचा भारतातच नव्हे जगभरात डंका, 'इतक्या' कोटींची केली कमाई
  2. Vatsal Sheth And Ishita Dutta : इशिता दत्ता आणि वत्सल सेठच्या घरी पहिल्यांदाच हलणार पाळणा, झाली पुत्ररत्नाची प्राप्ती
  3. Manipur Sexual Violence : अक्षय कुमार आणि उर्मिला मातोंडकरने मणिपूर लैंगिक अत्याचार विरुद्ध केला संताप व्यक्त...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.