ETV Bharat / entertainment

Ananya And Aditya : आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे डिनर डेटवर झाले स्पॉट ; व्हिडिओ व्हायरल...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2023, 11:29 AM IST

Updated : Oct 28, 2023, 2:17 PM IST

Ananya And Aditya : हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार्स आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे शुक्रवारी रात्री डिनर डेटसाठी गेले होते. यावेळी दोघंही काळ्या रंगाच्या पोशाखात सुंदर दिसत होते.

Aditya Kapur and  Ananya Panday
आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे

मुंबई - Ananya And Aditya : बी-टाऊनमधील स्टार कपल आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे त्यांच्या नात्यामुळं नेहमीच चर्चेत असतात. आदित्य- अनन्या अनेकदा एकत्र दिसतात. दरम्यान आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे शुक्रवारी रात्री डिनर डेटसाठी गेलं होतं. दोघेही कॅमेऱ्यासमोर हसत रेस्टॉरंटमध्ये दाखल झाले. सध्या त्यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये दोघांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळतेय. अनन्या ही आदित्य रॉय कपूरचा हात धरून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवताना दिसत आहे. अनन्यानं ज्याप्रकारे आदित्यच्या खांद्यावर डोकं ठेवलं आहे, ते पाहून दोघंही एकमेकांच्या प्रेमात असल्याचा अंदाज लावायला त्यांच्या चाहत्यांना वेळ लागला नाही.

अनन्या आणि आदित्य एकत्र झाले स्पॉट : डिनर डेटवर हे युगुल काही जणांशी बोलताना दिसतं. अनन्यानं काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तिने केस मोकळे सोडले आहेत. याशिवाय तिनं लाईट मेकअप केला आहे. या लूकमध्ये ती कमालीची देखणी दिसत आहे. दुसरीकडे आदित्यनं काळ्या टी-शर्टसोबत काळी पँट मॅच केलीय. यावर त्यानं शूजसह आणि घड्याळाने त्याने स्वतःचा लूक परफेक्ट केलाय. ही जोडी एकत्र खूपच क्यूट दिसतेय. आदित्य आणि अनन्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर अनेकजण त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करतायत. एका यूजरनं पोस्टवर कमेंट करत म्हटलं, 'आदित्यच्या तुलनेत अनन्या पांडे त्याच्यात हरवलेली दिसत आहे.' दुसऱ्या एकानं म्हटलं, 'लव्हली.' दुसरीकडे, काही जणांनी त्यांच्या जोडीला मिसमॅच म्हटलं आहेत, कारण दोघांच्या वयात 13 वर्षांचे अंतर आहे.

वर्कफ्रंट : अलीकडच हे कपल काही महिन्यांपूर्वी स्पेनमध्ये गेलं होतं. त्यांच्या रोमँटिक युरोपियन सुट्टीचे अनेक फोटो आणि व्हि़डिओ व्हायरल झाले होते. अनन्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती 'खो गये हम कहाँ' या चित्रपटात दिसणार आहे. याआधी तिनं रणवीर सिंग आणि आलिया भट्ट स्टारर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये गाण्यासाठी विशेष भूमिका साकारली होती. याशिवाय ती शेवटी आयुष्मान खुरानासोबत 'ड्रीम गर्ल 2' या कॉमेडी चित्रपटात दिसली होती. दुसरीकडे आदित्य रॉय कपूर हा सारा अली खानबरोबर 'मेट्रो इन दिनो'मध्ये दिसणार आहे. आतापर्यंत शेवटचा तो 'द नाईट मॅनेजर' या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसला होता.

हेही वाचा :

  1. Saif Ali Khan : सैफ अली खानच्या घरी पोहोचले मुंबई पोलीस, काय आहे कारण?
  2. Allu Arjun wish for David Warner : अल्लु अर्जुननं डेव्हिड वॉर्नरला दिल्या 'पुष्पा' स्टाईलमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा
  3. Weekend Ka Vaar: सलमाननं विकी जैनचा पर्दाफाश केल्यानं अंकिताच्या डोळ्यात पाणी, मन्नारामुळे अभिषेकनं खाल्ले टोमणे

Last Updated : Oct 28, 2023, 2:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.