मुंबई - Rubina dilaik : रुबीना दिलैक ही टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रुबिना तिच्या प्रेग्नंसीच्या बातमीमुळे सध्या चर्चेत आहे. दरम्यान आता रुबीना दिलैकनं नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिच्यासोबत तिचा पती अभिनव शुक्ला दिसतोय. ही पोस्ट शेअर करून तिनं तिच्या गरोदरपणाची घोषणा केली आहे. यापूर्वी सोशल मीडियावर रुबीनानं अनेक फोटो पोस्ट केले होते, मात्र तिनं कधीच गरोदरपणाच्या वृत्तावर प्रतिक्रिया दिली नव्हती. रुबीनानं ही पोस्ट शेअर केल्यानंतर अनेक चाहते तिला शुभेच्छा देत आहे. रुबीनाच्या फोटोमध्ये तिचा बेबी बंप हा स्पष्ट दिसतोय.
एकत्र प्रवास : फोटोंमध्ये दिसेल की रुबीनानं काळ्या रंगाचा टी-शर्टसह लोअर आणि जॅकेट परिधान केलंय. तर अभिनव व्हाईट हुडी आणि जीन्स अशा कूल लूकमध्ये आहे. पहिल्या फोटोमध्ये अभिनव हा रुबीनाचं बेबी बंप फ्लॉंट करताना दिसतोय. तर दुसऱ्या फोटोमध्ये रुबीना बेबी बंप फ्लॉंट करत आहे, तर अभिनवनं तिच्या बेबी बंपवर हात ठेवला आहे. तिसऱ्या फोटोमध्ये दोघंही उभे राहून फोटोसाठी पोझ देत आहेत. हे फोटो शेअर करताना रुबिनानं लिहिले की, 'जेव्हा आम्ही एकमेकांना डेट करत होतो, तेव्हा आम्ही वचन दिले होतं की, आम्ही एकत्र जग एक्सप्लोर करू. लग्न झालं आणि एक कुटुंब म्हणून आम्ही लवकरच छोट्या ट्रॅव्हलरचं स्वागत करू!
रुबीना आणि अभिनवचं लग्न : रुबीना 2024 मध्ये तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. रुबीनानं दीर्घकाळ डेट केल्यानंतर अभिनवशी 2018 मध्ये लग्न केलं. अभिनव आणि रुबीना यांची पहिली भेट लोकप्रिय टीव्ही सीरियल 'छोटी बहू'च्या सेटवर झाली होती. त्यानंतर ही जोडी 'बिग बॉस 14'मध्ये देखील दिसली होती. रुबीना 'बिग बॉस 14'ची विजेती ठरली. रुबीना ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अनेकदा ती आपल्या चाहत्यांबरोबर सोशल मीडियाद्वारे संवाद साधत असते. रुबिनाला अनेक शोच्या ऑफर आल्या आहे, मात्र गरोदरपणामुळं तिनं या ऑफर्स नाकारल्या आहेत.
हेही वाचा :