मुंबई : करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाची वाट प्रेक्षक खूप आतुरेने पाहत होते. आता प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आहे. आज 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल होत आहे. या चित्रपटाचे ३१,००० पेक्षा जास्त तिकिटे आधीच बुक करण्यात आली आहेत. २८ जुलै २०२३ रोजी हा चित्रपट संपूर्ण जगभर प्रदर्शित होत आहे. करण जोहरने १९९८मध्ये 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत एंट्री केली होती. वर्ष २००० मध्ये कौटुंबिक पंजाबी शैलीतील गाणी आणि नृत्याने परिपूर्ण चित्रपटांचा ट्रेंड रूपेरी पडद्यावर सुरू झाला होता. ९०च्या दशकापासून ते आजपर्यत चित्रपटांमध्ये खूप बदल झाला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपट : बऱ्याच दिवसांनी करण दिग्दर्शकाच्या खुर्चीवर परतला आहे, त्यामुळे त्याला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहे. पंजाबी शैलीतील चित्रपटात बंगाली तडका जोडून एक कौटुंबिक प्रेमकथा बनवली आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंगची जबरदस्त केमिस्ट्री दाखविण्यात आली आहे. या चित्रपटात आलिया आणि रणवीर व्यतिरिक्त धर्मेंद्र, शबाना आझमी, जया बच्चन, प्रिती जिंटा असे अनेक कलाकार आहेत, जे रूपेरी पडद्यावर प्रेक्षांकाचे मनोरंजन करणार आहेत. या चित्रपटामध्ये झुमका, तुम क्या मिले ही गाणी चित्रपट रिलीजपूर्वी हिट झाली आहेत, त्यामुळे आता हा चित्रपट पण रूपेरी पडद्यावर हिट होईल अशी अपेक्षा केली जात आहे.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाबद्दल : दिल्लीतील पंजाबी मिठाई विक्रेता रॉकी रंधावा आणि सुशिक्षित बंगाली कुटुंबातील न्यूज अँकर मुलगी राणी चॅटर्जी यांची ही प्रेमकथा आहे. या चित्रपटात धर्मेंद्र रणवीर सिंगचे आजोबा झाले असून शबाना आझमी आलियाची आजी झाली आहे. धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्यात पूर्वी प्रेम असते, ही गोष्ट जेव्हा रॉकी आणि राणी माहित होते तेव्हा दोघे आजी-आजोबांचे अपूर्ण प्रेम पूर्ण करून देण्याचे प्रयत्न करत असतात. पण या सगळ्यात रणवीर सिंगची आजी म्हणजेच जया बच्चन जी कडक सासू आहे, जी कुठलेही नाते निर्माण होऊ देत नाहीत. अशा परिस्थिती रॉकी राणीला त्यांच्या कुटुंबाशी आणि वातावरणाशी कसा जोडतो आणि त्यांची प्रेमकथा कशी पूर्ण होते, हीच या चित्रपटाची कहाणी आहे.
चित्रपटामधील काही क्षण : चित्रपटात अनेक मजेदार क्षण आहेत, पण सर्वात खास म्हणजे बंगाली आणि पंजाबी कुटुंबांमधील भांडण. याशिवाय धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचे रोमँटिक सीन या चित्रपटात दाखविण्यात आले आहेत. या चित्रपटाद्वारे रणवीर सिंग आणि आलिया दुसऱ्यांदा एकत्र आले आहेत. याशिवाय चित्रपटात आलिया भट्टच्या आई-वडिलांच्या भूमिकेत चुर्णी गांगुली आणि तोटा रॉय चौधरी दिसणार आहेत. त्याचबरोबर रणवीर सिंगच्या आई-वडिलांच्या भूमिकेत क्षिती जोग, आमिर बशीर हे कलाकर दिसणार आहे. या चित्रपट सर्वांचाच अभिनय प्रेक्षकांना खूप आवडेल असे दिसत आहे, कारण या चित्रपटाला आधीच प्रेक्षकांनी पसंत केले आहेत.
हेही वाचा :