मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' बॉक्स ऑफिसवर खूप कमाई करत आहे. चित्रपटाने रिलीजच्या चार दिवसांत ५० कोटींचा टप्पा ओलांडला. मात्र ५व्या दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने कमी कमाई केली. करण जोहरच्या 'धर्मा प्रॉडक्शन'च्या बॅनरखाली बनवलेल्या या चित्रपटाची जगभरातील कमाई मंगळवारी १०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ११. १ कोटींचा व्यवसाय केला होता. शनिवारी आणि रविवारी रणवीर-आलियाच्या चित्रपटाने खूप कमाई केली होती. पहिल्या वीकेंडला या चित्रपटाने भारतामध्ये ४५.८१ रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. हा चित्रपट १७८ कोटी रुपयांच्या भव्य बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाभोवतीची सकारात्मक चर्चा आहे आणि प्रेक्षकांची थिएटरमध्ये गर्दी वाढविण्यासाठी माउथ पब्लिसिटी खूप मोठी भूमिका बजावत आहे.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' ५ दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
डे इंडिया नेट कलेक्शन चेंज
- पहिला दिवस ₹ ११.१ कोटी
- दिवस २ ₹ १६.०५ कोटी
- दिवस 3 ₹ १८.७५ कोटी
- दिवस ४ ₹ ७.०२ कोटी
- दिवस ५ ₹ ७ कोटी (अंदाजे)
- एकूण संकलन: ₹ ५९.९२ कोटी
'रॉकी और रानी की लव्हस्टोरी'चे बजेट : या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्यासह धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी आणि गरिमा अग्रवाल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाला भारतीय बॉक्स ऑफिसवर त्याची किंमत वसूल करण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. करण जोहरने या चित्रपटाच्या निमित्ताने प्रदीर्घ काळानंतर दिग्दर्शनाकडे पुन्हा मोर्चा वळवला. या चित्रपटाला मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादावरून हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे असे म्हणता येईल. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये गर्दी करत आहेत. येणाऱ्या काळात हा चित्रपट किती कमाई करेल हे पाहणे लक्षवेधी ठरेल.
हेही वाचा :
- Kangana Ranaut : कंगना रणौतची सुप्त इच्छा, विद्युत जामवालसोबतचा थ्रो बॅक व्हिडिओ शेअर
- Dream Girl 2 Trailer : विनोदांची आतिषबाजी आणि हास्याचे कारंजे उडवणारा 'ड्रीम गर्ल २' चा ट्रेलर रिलीज
- Kangana Ranaut Vs Javed Akhtar : कंगनाच्या खासगी तक्रारीनंतर न्यायालयाच्या समन्स विरोधात जावेद अख्तर यांची सत्र न्यायालयात धाव, नेमके प्रकरण काय?