मुंबई : अभिनेता रितेश देशमुखने नुकतीच चित्रपटसृष्टीत २० वर्षे पूर्ण केली. तसेच त्याची निर्मितीसंस्था 'मुंबई फिल्म कंपनी'ला नुकतीच १० वर्षे पूर्ण झाली. बॉलीवूडमध्ये अभिनयक्षेत्रात दशकभर काढल्यानंतर रितेश देशमुखने मराठी चित्रपटसृष्टीत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याचवेळी त्याने आपली निर्मितीसंस्थाही काढली. रितेशने 'मुंबई फिल्म कंपनी' (Mumbai Film Company completed 10 years) अंतर्गत त्याचा मराठी पदार्पण चित्रपट 'लय भारी' (Lay Bhari) ची निर्मिती केली. नंतर या निर्मितीसंस्थेच्या बॅनरखाली उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती झाली. त्यांच्या 'यलो' (Yellow Movie) ला ३ राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेले आहेत.
रितेश देशमुखने मानले आभार : या दशकपूर्ती संदर्भात बोलताना रितेश देशमुख (Riteish Deshmukh) व्यक्त होत म्हणाला, मुंबई फिल्म कंपनीला १० वर्षे पूर्ण झाले आहेत. या १० वर्षात ६ यशस्वी चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. लय भारी, येलो, फास्टर फेणे, बालक पालक, माऊली आणि वेड अशा आशयघन चित्रपटांची निर्मिती मुंबई फिल्म कंपनीने (Mumbai Film Company) केली आणि ही फक्त सुरुवात आहे. तुमच्या अफाट प्रेम, आशीर्वाद आणि विश्वासाबद्दल धन्यवाद.
चित्रपटाला चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिले : बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुखचा मराठी चित्रपट 'वेड' (Ved Movie) ३० डिसेंबरला प्रदर्शित झाला. यात रितेश देशमुखने त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसूझासोबत (Actress Genelia DSouza) भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिले आहे. या वर्षी जुलैमध्ये रितेशने त्याच्या चित्रपटाचे शुटिंग पूर्ण झाल्याचे कळवले होते. विशेष म्हणजे अभिनेता सलमान खान त्याच्या दिग्दर्शनाच्या पहिल्या प्रोजेक्टमध्ये पाहुण्यांच्या भूमिकेत दिसला. 'वेड' चित्रपटातून जेनेलिया डिसूझाही मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
रितेश देशमुखच्या वर्कफ्रंटबद्दल : दरम्यान, रितेश नुकताच तमन्ना भाटियासोबत 'प्लॅन ए प्लान बी' या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात दिसला होता. शशांक घोष दिग्दर्शित, या चित्रपटाचा प्रीमियर केवळ नेटफ्लिक्सवर झाला आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तो सोनाक्षी सिन्हा आणि साकिब सलीम सोबत आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट 'काकुडा' मध्ये देखील दिसणार आहे.