ETV Bharat / entertainment

Prequel of Kantara : ऋषभ शेट्टीने केली कंताराच्या भव्य प्रीक्वेलची घोषणा

author img

By

Published : Feb 7, 2023, 10:16 AM IST

कंतारा चित्रपटाला देशभर जबरदस्त प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाला रिलीज होऊन १०० दिवस झाल्यानंतर दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टीने कंताराच्या प्रीक्वेलची घोषणा केली आहे. कथाच्या तपशीलावर काम सुरू असून पुढील वर्षी हा भव्य प्रीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे ऋषभने सांगितले.

ऋषभ शेट्टीने केली कंताराच्या भव्य प्रीक्वेलची घोषणा

मुंबई - ऋषभ शेट्टी दिग्दर्शित पॅन इंडिया कन्नड चित्रपट कंतारा तुम्हाला आवडत असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंतारा चित्रपटाला १०० दिवस पूर्ण होत असताना चित्रपटाचा स्टार आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने कंताराच्या प्रीक्वेलची घोषणा केली आहे.

ऋषभ शेट्टी म्हणाला, 'आम्ही खूप आनंदी आहोत आणि प्रेक्षकांचे आभारी आहोत ज्यांनी कंताराला अपार प्रेम आणि पाठिंबा दाखवला आणि आमता प्रवास पुढे नेला. सर्वशक्तिमान दैवताच्या आशीर्वादाने चित्रपटाने यशस्वीरित्या 100 दिवस पूर्ण केले आहेत आणि मला ही संधी साधायची आहे. कंताराच्या प्रीक्वेलची घोषणा करत आहे. कंतारा चित्रपटाचा हा दुसरा भाग पुढच्या वर्षी तुमच्या भेटीस आणत आहे. मी कंतारा चित्रपटाचे शूटिंग करत असताना ही कल्पना माझ्या मनात चमकून गेली कारण कंताराचा इतिहास अधिक सखोल आहे आणि सध्या, आम्ही लेखनाच्या भागाशी संबंधित अधिक तपशील शोधण्याच्या मागे आहोत. संशोधन अद्याप प्रगतीपथावर असल्याने, चित्रपटाबद्दल तपशील उघड करणे फार घाईचे होईल.'

या प्रसंगी उपस्थित राहून, निर्माते, विजय किरगंडूर यांनी देखील याबद्दल खुलासा केला आणि ते म्हणाले, 'कंताराने प्रेक्षकांना पूर्णपणे नवीन सिनेमाची ओळख करून दिली आणि आम्हाला या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये जो जोष निर्माण केला आहे तो टिकवून ठेवायला आणि वाढवायला आवडेल. चित्रपटाने आता 100 दिवस पूर्ण केले आहेत म्हणून आम्ही प्रीक्वेलची घोषणा करून हा जोष वाढवायला मदत करत आहोत. ऋषभ आणि आमची टीम कथेवर कठोरपणे काम करत आहे कारण चित्रपटात कंताराची मागील कथा उघडताना प्रेक्षकांना सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत आणि आम्ही ते करू शकतो. कंताराचा सीक्वल पूर्वीपेक्षा अधिक भव्य असेल याची हमी आम्ही देत आहोत.'

ऋषभ शेट्टी लिखित आणि दिग्दर्शित आणि अभिनीत हा चित्रपट कंबाला चॅम्पियनच्या भोवती फिरतो जो वन अधिकाऱ्याशी भांडण करतो. कर्नाटकातील लोककथेवर आधारित त्यातील कॅप्चर दृश्य उत्कृष्टतेसाठी कंताराचे कौतुक करण्यात आले. कंबाला ही एक वार्षिक शर्यत आहे, जी नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत किनारपट्टीच्या कर्नाटकात आयोजित केली जाते, ज्यामध्ये एक धावपट्टू म्हशीच्या जोडीला, नांगराला बांधलेल्या, चिखलाच्या मार्गावरून शर्यत करतो.

कंतारा हा चित्रपट कन्नड, तेलुगु, हिंदी, मल्याळम, तुलु या भाषेत रिलीज झाला होता. बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई या चित्रपटाने केली होती.

हेही वाचा - Sidharth Kiara Wedding : संगीत सेरेमनीमध्ये सिद्धार्थ कियाराचा जोरदार डान्स, या पाहुण्यांनीही दिला परफॉर्मन्स

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.