मुंबई - कन्नड अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचा 'कंतारा' चित्रपट प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याचा ओटीटी प्रवास सुरू करण्यासाठी सज्ज झाला आहे.
बुधवारी, इन्स्टाग्रामवर अमेझॉन प्राइम आणि दिग्दर्शक ऋषभ यांनी चित्रपटाचे पोस्टर पोस्ट केले आणि "सर्व प्रतीक्षा संपवत आहे!!!#KantaraOnPrime, उद्या बाहेर," अशी कॅप्शन लिहिली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
'कंतारा 24 नोव्हेंबरपासून अमेझॉन प्राइमवर स्ट्रिमिंग होईल आणि ते तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या चार भाषांमध्ये उपलब्ध असेल. हिंदी भाषिक प्रेक्षकांनी मात्र कमेंट सेक्शनमध्ये निराशा व्यक्त केली आहे.
एका युजरने लिहिले की, "गाईज हिंदी व्हर्जनही येईल पण गोष्ट अशी आहे की कंतारा अजूनही थिएटरमध्ये हिंदी बेल्टमध्ये धमाल करत आहे. त्यामुळे धीर धरा." दुसर्या युजरने कमेंट केली, "हिंदी मै रिलीज देर क्यू करते हो??"
ऋषभ शेट्टी दिग्दर्शित 'कंतारा' 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि त्याच्या कथानकासाठी आणि अप्रतिम व्हिज्युअलसाठी प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. होंबळे फिल्म्स निर्मित, 'कंटारा'मध्ये ऋषभ शेट्टी, प्रमोद शेट्टी, अच्युथ कुमार, सप्तमी गौडा आणि दाक्षिणात्य अभिनेता किशोर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
गेल्या काही वर्षांत, 'बाहुबली', 'केजीएफ', 'पुष्पा', 'कार्तिकेय 2' आणि आता 'कंतारा' यांसारख्या अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांना त्यांच्या अप्रतिम आशयासाठी जगभरात प्रशंसा मिळाली.
हेही वाचा - प्रकृती अस्वास्थ्यामुळे कमल हसन यांना चेन्नईच्या रुग्णालयात दाखल