मुंबई - Richa chadha and ali fazal : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि तिचा पती अभिनेता अली फजल यांनी 'गर्ल्स विल बी गर्ल्स'द्वारे उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हा चित्रपट प्रतिष्ठित सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये दोघांनी एकत्र काम केल्यामुळं ही या दोघांसाठी एक विशेष उपलब्धी ठरली आहे. शुची तलाठी दिग्दर्शित, हा चित्रपट उत्तर भारतातील एका लहान हिमालयीन टेकडीवरील बोर्डिंग स्कूलवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये मीरा नावाच्या 16 वर्षाच्या मुलीचा जीवनप्रवास दाखविण्यात आला आहे. अली फजल आणि रिचा चढ्ढा यांची ही पहिलीच चित्रपट निर्मिती आहे.
रिचा चढ्ढा आणि अली फजल यांचा चित्रपट : मार्च 2021 मध्ये रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी लॉन्च केलेल्या 'पुशिंग बटन स्टुडिओ' बॅनरखाली निर्मित, 'गर्ल्स विल बी गर्ल्स' मध्ये कनी कुश्रुती बरोबर जितीन गुलाटी, प्रीती पाणिग्रही आणि केशव बिनॉय किरण हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट खूप भावनिक आहे. या चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक शुचीनं म्हटलं, ''माझ्या पहिल्या फिचर फिल्मची निवड सिनेमाच्या मक्का, सनडान्स येथे झाली याचा मला आनंद आहे. या मोठ्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात भारतातील एका चित्रपटाचा समावेश होताना पाहून मला आनंद होत आहे. या चित्रपटाची कहाणी ही आई आणि मुलीच्या प्रेमावर आहे''.
'गर्ल्स विल बी गर्ल्स' या चित्रपटाबद्दल दिली ऋचा चढ्ढानं प्रतिक्रिया : या चित्रपटाबद्दल बोलताना निर्मात्या रिचा चढ्ढानं म्हटलं, "अली आणि मी अनोखी कहाणी सांगण्याच्या दृष्टिकोनातून या चित्रपटाची निर्मिती केली. 'सनडान्स'मध्ये या चित्रपटाची निवड झाली, यामुळं आम्ही केलेल्या काम चांगलं आहे हे याद्वारे दिसून येते. आम्ही एका यशामुळं उत्साहीत होऊ शकत नाही. जगभरातील प्रेक्षक चित्रपटाशी जोडले जातील ही आमची अपेक्षा आहे. शुचीचा आवाज, सिनेमॅटिक दृष्टिकोन आणि आमच्या नवीन अभिनेत्यांचा उत्कृष्ट परफॉर्मन्स जगाला बघायला मिळेल याबद्दल मला आनंद आहे.''
हेही वाचा :