ETV Bharat / entertainment

Sridevi Death Anniversary: बोनी कपूरसोबतची रंजक प्रेमकहाणी ते चटका लावणारी एक्झीट, जाणून घ्या सिनेजगताच्या चांदणीच्या कहाणी - श्रीदेवी

सिनेजगताची चांदणी असलेल्या श्रीदेवी यांचा २४ फेब्रुवारीला दुबईत संशयास्पदरित्या अंत झाला. त्यांच्या निधनाने सिनेजगतावर शोककळा पसरली. मात्र श्रीदेवीने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर तब्बल तीन दशके अधिराज्य गाजवले. त्यांची बोनी कपूर यांच्यासोबतची लव्हस्टोरीही चांगलीच चर्चेत होती.

Sridevi Death Anniversary
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Feb 24, 2023, 10:51 AM IST

मुंबई : सिने जगताची चांदनी असलेल्या श्रीदेवी यांचा आज स्मृतीदिन आहे. 24 फेब्रुवारी १९१८ ला श्रीदेवीचा दुबईतील जुमैराह एमीरेट्स टॉवर या हॉटेलमध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झाला. मात्र श्रीदेवींने आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपटातून चाहत्यांना भुरळ घातली आहे. आपल्या अदाकारीने श्रीदेवीने हिंदीसह तमीळ, तेलुगु, कन्नड चित्रपटातही आपली छाप पाडली आहे. मात्र त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात रंजक गोष्ट त्यांच्या लग्नाविषयी आहे. विवाहित बोनी कपूरसोबत त्यांनी लग्न केल्यानंतर बॉलिवूडला धक्का बसला होता. तर जाणून घेऊया श्रीदेवीच्या कारकिर्दीबाबत सविस्तर माहिती.

वयाच्या ४ थ्या वर्षी केले अभिनयात पदार्पण : तामीळनाडूतील मिनापट्टी या गावात श्रीदेवी यांचा १३ ऑगस्ट १९६३ ला जन्म झाला आहे. त्यांचे पूर्ण नाव श्री अम्मा यंगर अयप्पन असे आहे. मात्र त्यांना त्यांच्या पहिल्या नावावरुन श्रीदेवी असेच संबोधले जाते. श्रीदेवी यांनी वयाच्या ४ थ्या वर्षीच अभिनयाला सुरुवात केली होती. त्यांनी अभिनय केलेला पहिला चित्रपट कंधन करुणई हा होता. या चित्रपटाच्या माध्यमातून श्रीदेवी यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर श्रीदेवींना लगेच हिंदी चित्रपट सृष्टीतही अभिनय करण्याची संधी मिळाली. रानी मेरा नाम या चित्रपटातून श्रीदेवींनी हिंदी चित्रपटात पदार्पण केले. त्यानंतर तब्बल तीन दशके श्रीदेवींनी बॉलिवूडवर राज्य केले. हिम्मतवाला या चित्रपटाने श्रीदेवींना अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर तर जितेंद्र आणि श्रीदेवीची जोडी तुफान लोकप्रिय झाली.

बॉलिवूडची चांदणी : हिम्मतवाला चित्रपटाने श्रीदेवीला घराघरात पोहोचवले. त्यानंतर श्रीदेवीने तब्बल तीन दशके बॉलिवूडवर अधिराज्य केले. श्रीदेवीला आपल्या चित्रपटात अभिनेत्री म्हणून साईन करण्यासाठी निर्मात्यांनी श्रीदेवीला पहिली पसंती दिली. निर्माता ऋषी कपूर आणि श्रीदेवी यांच्या आलेल्या चांदनी या गाण्यामुळे तर श्रीदेवीला बॉलिवूडमधील चांदणी म्हणूनच संबोधले जाऊ लागले.

बोनी कपूर श्रीदेवीची लव्हस्टोरी : बोनी कपूर यांनी श्रीदेवीला त्यांच्या मिस्टर इंडिया या चित्रपटात साईन केले होते. या चित्रपटात अनिल कपूर आणि श्रीदेवीची प्रमुख भूमीका होती. मात्र चित्रपटाच्या दरम्यान श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्यात चांगलीच मैत्री झाली होती. बोनी कपूर यांना श्रीदेवी मनोमन आवडत असल्याची चर्चा तेव्हा बॉलिवूडमध्ये होती. त्यामुळेच बोनी कपूर यांनी श्रीदेवीला या चित्रपटात ठरलेल्या मानधनापेक्षाही जास्त मानधन दिल्याची चर्चा करण्यात आली. बोनी कपूर आणि श्रीदेवीच्या जवळीकीची कुणकुण बोनी यांच्या पहिल्या पत्नीलाही लागली होती. मात्र बोनी कपूर यांनी श्रीदेवी आणि माझ्यात भावा बहिणीचे नाते असल्याची अगोदर ओळख करुन दिल्याची चर्चाही बीटाऊनमध्ये करण्यात येते. त्यामुळे बोनी कपूर यांची पत्नी निश्चित होती. मात्र श्रीदेवी गरोदर राहिल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यानंतर बोनी कपूरने आपल्या पहिल्या पत्नीला कायदेशीर घटस्फोट देऊन श्रीदेवीसोबत लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुली झाल्या.

सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री : श्रीदेवीने आपल्या अबिनय कौशल्याने तब्बल तीन दशके बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले. ८० आणि ९० च्या दशकात श्रीदेवीने तब्बल ३०० पेक्षाही जास्त चित्रपटात अभिनय केला आहे. त्यासह त्यांनी तमीळ, तेलुगु, कन्नड, आदी भाषातील चित्रपटातही अभिनय केला आहे. इंग्लिश विंग्लिश या चित्रपटातून त्यांनी लग्नानंतर पुन्हा चित्रपटात कमबॅकही केले होते. त्यांच्या कारकिर्दीत सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणूनही श्रीदेवीचा उल्लेख करण्यात येतो. ८० आणि ९० दशकातही श्रीदेवी एक कोटीपेक्षा जास्त मानधन घेत होत्या.

हेही वाचा - Nawazuddin Siddiqui Case : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला न्यायालयाचा दिलासा, हुंडा छळाची फेटाळली याचिका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.