ETV Bharat / entertainment

Indian 2 major update : कमल हासनच्या चाहत्यांसाठी गोड बातमी, 'इंडियन 2'च्या प्रदर्शनाबाबत लेटेस्ट अपडेट - इंडियन चित्रपटाचा सिक्वेल

Indian 2 major update : कमल हासनच्या 1996 मध्ये आलेल्या इंडियन चित्रपटाचा सिक्वेलबाबत प्रॉडक्शन हाऊसनं अपडेट देणार असल्याचं कळवलंय. 'इंडियन 2' या चित्रपटाची चाहते खूप प्रतीक्षा करताहेत. याविषयीचे अपडेट उद्या सकाळी 11 वाजता पाहायला मिळणार आहे.

Indian 2 major update
कमल हासनच्या चाहत्यांसाठी गोड बातमी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2023, 2:13 PM IST

हैदराबाद - Indian 2 major update : तमिळ चित्रपटाचे नामवंत दिग्दर्शक शंकर सध्या 'इंडियन 2' हा महत्त्वकांक्षी चित्रपट बनवत आहे. कमल हासनची यात प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाची निर्मिती लायका प्रॉडक्शन आणि रेड जायंट मुव्हीज या प्रॉडक्शनच्या माझ्यमातून सुबास्करन अल्लीराजा आणि उदयनिधी स्टॅलिन यांनी केली आहे. इंडियन 2 हा चित्रपट 1996 च्या 'इंडियन' चित्रपटाचा सिक्वेल आहे आणि त्यात कमल हासन इंडियन - सेनापती ही व्यक्तीरेखा पुन्हा साकारत आहेत.

या चित्रपटाबाबत लायका प्रॉडक्शनने नवीन अपडेट दिले आहे. 'कॉपी मिळाली असून प्रोसेसिंग सुरू झालंय.' नव्या अपडेटसाठी उद्या सकाळी 11 वाजता संपर्कात राहा. यापूर्वी स्वातंत्र्य दिनानिमित्त 'इंडियन 2' च्या निर्मात्यांनी कमल हसनच्या लूकचे अनावरण करणारे चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले होते. पोस्टरमध्ये अभिनेता खाकीचा गणवेश आणि टोपी घातलेला दिसला होता.

'इंडियन 2' चित्रपटाचा नायक एक वृद्ध स्वातंत्र्यसैनिक जागरुक बनतो आणि भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी कारवायांच्या विरोधात भूमिका घेतो. चित्रपटात सिद्धार्थ, काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंग, प्रिया भवानी शंकर, कालिदास जयराम, गुलशन ग्रोवर, नेदुमुदी वेणू, विवेक, समुथिरकनी, बॉबी सिम्हा, गुरु सोमसुंदरम, दिल्ली गणेश, जयप्रकाश, मनोबाला, वेणिशोर, जयप्रकाश आणि दीपा शंकर यांनी सहाय्यक कलाकार म्हणून भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाचे संगीत संयोजन अनिरुद्ध रविचंदर यांनी केले आहे, तर छायांकन रवि वर्मन आणि रथनवेलू यांनी केले आहे. ए. श्रीकर प्रसाद यांनी संकलनाची जबाबदारी पार पाडली आहे.

इंडियन चित्रपटाच्या सिक्वेलची कल्पना सुरुवातीला दिग्दर्शक शंकर यांनी मे 2015 मध्येच आखली होती. त्यानंतर चित्रपटाची अधिकृतपणे घोषणा सप्टेंबर 2017 च्या शेवटी करण्यात आली. दक्षिणेतील मोठे निर्माता दिल राजू या चित्रपटाची निर्मिती करणार होते. परंतु चित्रपटाचे बजेट खूप जास्त होत असल्यामुळे लायका प्रॉडक्शनकडे हा प्रोजेक्ट हस्तांतरित करण्यात आला. इंडियन 2 चित्रपटाच्या शुटिंगला 2019 मध्ये जानेवारीत सुरुवात झाली. त्यानंतर याचं शूटिंग चेन्नई, राजमुंद्री, भोपाळ आणि ग्वाल्हेर या ठिकाणी पार पडले. फेब्रुवारी २०२० मध्ये चित्रपटाच्या सेटवर दुर्दैवी अपघात झाला होता आणि सेटवरील क्रू मेंबर्सही मरण पावले होते.

कोविड-19 महामारी, बजेट ओव्हररन्स आणि कायदेशीर विवाद यासारख्या विविध कारणांमुळे 'इंडियन 2' ची निर्मिती सतत लांबत चालली होती. त्यानंतर गेल्या वर्षी या निर्मितीमध्ये रेड जायंट मुव्हीजनेही सहभाग घेतला आणि शूटिंगला पुन्हा सुरुवात झाली. तिरुपती, चेन्नई, जोहान्सबर्ग आणि तैवान येथे अतिरिक्त सीक्वेन्स शूट करण्यात आले आहे.

हेही वाचा -

1. Koffee With Karan 8 : रणवीरनं सांगितला दीपिकाच्या नैराश्येचा किस्सा, करण जोहरलाही आला होता पॅनिक अटॅक

2. Tejas Box Office Collection Day 2: कंगना रणौत स्टारर 'तेजस' चित्रपटाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ...

3. Ananya And Aditya : आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे डिनर डेटवर झाले स्पॉट ; व्हिडिओ व्हायरल...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.