ETV Bharat / entertainment

Kamal Hasan in Project K : 'म्हणून मी हा चित्रपट स्वीकारला...' कमल हासनने सांगितले 'प्रोजेक्ट के' स्वीकारण्याचे कारण - Kamal Haasan opens up

'प्रोजेक्ट के' चित्रपटाच्या सॅन दिएगो कॉमिक कॉन इव्हेन्टमध्ये बोलताना कमल हासन यांनी या चित्रपटात भूमिका का स्वीकारली याचा खुलासा केला आहे. त्यांनी नाग अश्विन यांच्या 'कल्की २८९८ एडी'चित्रपटात खलनायकाची भूमिका करण्यामागचे कारणही सांगितले आहे.

Kamal Hasan in Project K
कमल हासनने सांगितले 'प्रोजेक्ट के' स्वाकारण्याचे कारण
author img

By

Published : Jul 21, 2023, 12:53 PM IST

मुंबई - दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन 'प्रोजेक्ट के' या बहुचर्चित चित्रपटात सामील झाल्यापासून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दिग्दर्शक नाग अश्विन यांनी या चित्रपटासाठी भारतातील स्टार पॉवर एकत्र करुन यान महत्त्वकांक्षी चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'प्रोजेक्ट के' म्हणजेच 'कल्की २८९८ एडी' असे शीर्षक असलेल्या या चित्रपटात कमल हासन खलनायकाची भूमिका साकारत आहे.

अमेरिकेतील सॅन दिएगो येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य लॉन्चिंग सोहळ्यात कमल हासन यांनी नाग अश्विन यांचा 'प्रोजेक्ट के' चित्रपट का स्वीकारला याबद्दल सांगितले. कमल हासन म्हणाले की, 'चित्रपट स्वीकारण्याचे कारण म्हणजे मी समांतर चित्रपटातून आलो आहे. नकारात्मकता असल्या शिवाय, सकारात्मकता नसते. त्यामुळे खलनायकाची भूमिका चित्रपटात महत्त्वाची असते.'

'कल्की २८९८ एडी' या चित्रपटात कमल हासन शिवाय अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी यांच्याही भूमिका आहेत. सॅन दिएगो कॉमिक कॉन २०२३ सोहळ्यात बिग बी अमिताभ यांनी व्हर्चुअली सहभाग घेतला आणि त्यांनी कमल हासन यांचे कौतुक केले. 'भारतीय प्रेक्षकांनी सिनेमात आणलेल्या उर्जेबद्दल आणि त्यांनी स्टार बनवल्याबद्दल कमल हासन यांनी श्रेय द्यायला सुरू केले', तेव्हा अमिताभ यांनी त्याला रोखले आणि बच्चन म्हणाले, ' कमल इतके विनम्र होण बंद कर, तू आम्हा सर्वांपेक्षा खूप खूप महान आहेस. '

कमल हासन यांनी अमिताभ यांच्या ब्लॉकबस्टर 'शोले' चित्रपटाचे सहायय्क दिग्दर्शक म्हणून काम केले होते यांचा संदर्भ देत अमिताभ म्हणाले की, 'माझ्या चित्रपटाविषयीची सर्वात चांगली गोष्ट ही होती की, मी याची कल्पनाही केली नव्हती.' बिग बी आणि कमल हासन तब्बल ४० वर्षानंतर एका चित्रपटात एकत्र काम करत आहेत. 'गिरफ्तार' या चित्रपटात त्यांनी चार दशकापूर्वी एकत्र काम केले होते.

'कल्की २८९८ एडी'या चित्रपटात कमा करण्यास सहमती दर्शवली याबद्दलचा अनुभव सांगताना नाग अश्विन म्हणाले की, 'हा एक नवीन काही करत असतानाचा मोठा सन्मान होता आणि त्यांनी या चित्रपटाच्या कास्टमध्ये येण्यासाठी सहमती दिली हे आमच्यासाठी एक विशेषाधिकार होता.' 'कल्की २८९८ एडी'हा वैजयंती मुव्हिज निर्मित चित्रपट १२ जानेवारी रोजी रिलीज हेणार आहे.

हेही वाचा -

१. Prabhas : 'प्रोजेक्ट के'च्या खऱ्या नावाचा झाला खुलासा ; जाणून घ्या....

२. Arjun Rampal : अर्जुन रामपाल ५० व्या वर्षी चौथ्यांदा झाला बाबा ; गर्लफ्रेंडने दिला बाळाला जन्म...

३. Trial Period web series : जेनेलिया देशमुखच्या 'ट्रायल पीरियड' वेब सिरीजचे २१ जुलै पासून होणार प्रसारण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.