ETV Bharat / entertainment

Tiger 3 trailer release date : 'टायगर 3' च्या ट्रेलरची प्रतीक्षा संपली, पोस्टरसह रिलीज तारखेची झाली घोषणा... - टायगर 3मधील सलमान खानचं पोस्टर रिलीज

Tiger 3 trailer release date : बॉलिवूड अभिनेता सलमान खाननं बुधवारी त्याच्या आगामी 'टायगर 3'चे पोस्टर रिलीज केले आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित आगामी स्पाय थ्रिलरमध्ये कतरिना कैफ देखील एजंट झोयाची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

Tiger 3 trailer release date
टायगर 3 ट्रेलर रिलीज डेट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2023, 1:34 PM IST

मुंबई - Tiger 3 trailer release date : सलमान खान आणि कतरिना कैफचा आगामी 'टायगर 3' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते 'टायगर 3'ची आतुरतेने वाट पाहत आहेत, सलमान खानच्या 'टायगर' फ्रेंचायझीचा हा तिसरा पार्ट आहे. 'टायगर 3' रिलीजची तारीख जवळ येत आहे त्यामुळे भाईजान चाहत्यांना एकामागून एक सरप्राईज देत आहे. पाच दिवसांनी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान आता मोस्ट अवेटेड चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. 'टायगर 3'च्या पोस्टरमध्ये सलमान खानचा इंटेन्स लूकमध्ये दिसत आहे. भाईजानचे हे लूक पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्कंठा आणखी वाढला आहे.

'टायगर 3'च्या नवीन पोस्टर : बुधवारी सलमान खाननं त्याच्या इन्स्टाग्रामवर 'टायगर 3' या आगामी चित्रपटाचे एक नवीन पोस्टर रिलीज केले, ज्यामध्ये तो गुडघ्यावर जमिनीवर बसलेलाआणि हातात बंदूक घेतलेला दिसत आहे. पोस्टरमध्ये सलमान काळ्या पँटसह जॅकेटमध्ये आहे. यावर काळा आणि पांढऱ्या रंगाचा स्कार्फ घातलेला दिसत आहे. या चित्रपटात सलमान पुन्हा एकदा सुपर एजंट टायगर उर्फ ​​अविनाश सिंह राठौरच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय 'टायगर 3' चा ट्रेलर 16 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. पोस्टर शेअर करताना सलमान खानच्या कॅप्शनमध्ये लिहलं, टायगर येत आहे 16 ऑक्टोबर रोजी. 'टायगर 3' ट्रेलरसाठी तयार व्हा! 'टायगर 3' ट्रेलरला रिलीज होण्यासाठी 5 दिवस बाकी आहे, हा चित्रपट या दिवाळीत चित्रपटगृहात हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये प्रदर्शित होईल.' असं सलमान खाननं आपल्या पोस्टमध्ये लिहलं आहे.

'टायगर 3' चे दिग्दर्शन, स्टारकास्ट : 'टायगर 3' हा टायगर फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे, ज्याची सुरुवात 2012 मध्ये 'एक था टायगर'ने झाली होती. 2017 मध्ये 'टायगर जिंदा है' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात कतरिना कैफ (झोया) आयएसआय एजंट आणि टायगरच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. कॅटरिनानं मंगळवारी या चित्रपटातील तिचा पहिला लूक पोस्टर शेअर केला, ज्यात ती एक अ‍ॅक्शनमोडमध्ये दिसली. या पोस्टरमध्ये ती बंदूक घेऊन होती. याशिवाय तिच्या चेहऱ्यावर काही जखमाही होत्या. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा :

  1. Happy Birthday Amitabh Bahchchan : बच्चन कुटुंबात सर्वाधिक कमाई बिग बीची, अभिषेक आणि ऐश्वर्याला टाकले मागे
  2. Mahadev App and Lion Book App Case : महादेव ॲपनंतर ईडीच्या रडारवर लायन बुक ॲप; 'या' बॉलिवूड कलाकारांची सुरू आहे चौकशी
  3. Mia khalifa : मिया खलिफालाही इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचा फटका; नोकरी गेली ना तिची..!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.