हैदराबाद - राम चरणच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी RC15 या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या शीर्षक लॉन्चिंग केले. सोमवारी, दिल राजूच्या बॅनर श्री वेंकटेश्वर क्रिएशन्सने सोशल मीडियाद्वारे राम चरणच्या चित्रपटाचे मोशन टायटल रिलीज केले. चित्रपटाचे दिग्दर्शक शंकर यांनी देखील RC15 चा शीर्षक लोगो ट्विटरवर शेअर आणि राम चरणला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लिहिल्या.
-
#GAMECHANGER it is…💥💥https://t.co/avGa74S8vH
— Sri Venkateswara Creations (@SVC_official) March 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Mega Powerstar @alwaysramcharan @shankarshanmugh @advani_kiara @DOP_Tirru @MusicThaman @SVC_official #SVC50 #RC15 #HBDGlobalStarRamCharan pic.twitter.com/2htttRsvPx
">#GAMECHANGER it is…💥💥https://t.co/avGa74S8vH
— Sri Venkateswara Creations (@SVC_official) March 27, 2023
Mega Powerstar @alwaysramcharan @shankarshanmugh @advani_kiara @DOP_Tirru @MusicThaman @SVC_official #SVC50 #RC15 #HBDGlobalStarRamCharan pic.twitter.com/2htttRsvPx#GAMECHANGER it is…💥💥https://t.co/avGa74S8vH
— Sri Venkateswara Creations (@SVC_official) March 27, 2023
Mega Powerstar @alwaysramcharan @shankarshanmugh @advani_kiara @DOP_Tirru @MusicThaman @SVC_official #SVC50 #RC15 #HBDGlobalStarRamCharan pic.twitter.com/2htttRsvPx
राम चरण बनला गेम चेंजर - राम चरणचा आगामी चित्रपट ज्याचे तात्पुरते नाव RC15 होते ते आता गेम चेंजर बनले आहे. राम चरणच्या चाहत्यांना त्याच्या वाढदिवसाची भेट म्हणून RC15 च्या निर्मात्यांनी गेम चेंजर चित्रपटाचे एक वेधक मोशन शीर्षक टाकले. कॅप्शनमध्ये त्यांनी गेम चेंजर लिहित ग्लोबल स्टार राम चरणसाठी शुभेच्छा दिल्या.गेम चेंजरचे दिग्दर्शक शंकर यांनीही ट्विटरवर राम चरण याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राम चरण मध्ये असलेले गुण त्याला गेम चेंजर बनवतात, अशा अर्थाची पोस्ट लिहिताना शंकर यांनी लिहिले, 'जगभरातील मोहक राम चरण याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, पडद्यावर भयंकर साहसी आणि एक प्रिय व्यक्ती तुला गेम चेंजर बनवते', असे त्याने लिहिले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
गेम चेंजरचे शूटिंग - गेम चेंजरची घोषणा फेब्रुवारी 2021 मध्ये करण्यात आली होती आणि ऑक्टोबर 2021 मध्ये ती पूर्ण झाली होती. प्रकल्पासंबंधीचे इतर तपशील गुपित ठेवले जात असताना, गेम चेंजरमध्ये राम चरण दुहेरी भूमिकेत दिसणार असल्याचे मोठ्या प्रमाणावर वृत्त आहे. हैदराबाद, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर चित्रित झालेल्या या चित्रपटाचे शूटिंग निर्मात्यांनी अद्याप पूर्ण केलेले नाही.
-
It’s a wrap for the song!! 🕺💃
— Sri Venkateswara Creations (@SVC_official) March 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Team #RC15 & #SVC50 kickstart Megapower Star @AlwaysRamCharan Birthday Celebrations. Stay tuned for more updates. @shankarshanmugh @advani_kiara @DOP_Tirru @MusicThaman @SVC_official pic.twitter.com/iBflT1Ap8D
">It’s a wrap for the song!! 🕺💃
— Sri Venkateswara Creations (@SVC_official) March 25, 2023
Team #RC15 & #SVC50 kickstart Megapower Star @AlwaysRamCharan Birthday Celebrations. Stay tuned for more updates. @shankarshanmugh @advani_kiara @DOP_Tirru @MusicThaman @SVC_official pic.twitter.com/iBflT1Ap8DIt’s a wrap for the song!! 🕺💃
— Sri Venkateswara Creations (@SVC_official) March 25, 2023
Team #RC15 & #SVC50 kickstart Megapower Star @AlwaysRamCharan Birthday Celebrations. Stay tuned for more updates. @shankarshanmugh @advani_kiara @DOP_Tirru @MusicThaman @SVC_official pic.twitter.com/iBflT1Ap8D
ग्लोबल स्टार राम चरण - आरआरआर चित्रपटाने आता राम चरणला ग्लोबल स्टार बनवले आहे. अभिनयाची उत्तम जाण आणि क्षमता असलेला राम चरण अष्टपैलू अभिनेता आहे. आजवर त्याने केलेल्या टॉलिवूड चित्रपटातील भूमिका याची स्पष्ट साक्ष देतात. वडिल चिरंजीवीचा त्याला एक मोठा वारसा लाभला असला तरी मगधीरापासून त्याने आपला एक स्वतंत्र प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे. जंजीर या चित्रपटातून तो हिंदीतही लॉन्च झाला होता. परंतु तो तिथे यशस्वी झाला नव्हता. मात्र आजच्या घडीला तो भारतातल्या आघाडीच्या लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. गेम चेंजरमध्ये कियारा अडवाणी देखील मुख्य भूमिकेत आहे. तेलुगु, तमिळ आणि हिंदी या तीन भाषांमध्ये रिलीझ होणारी, गेम चेंजर एक प्रभावशाली टीम आहे ज्यात SJ सूर्या, जयराम, अंजली आणि श्रीकांत यांचा समावेश आहे.
हेही वाचा - Ram Charan Birthday : राम चरणच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम तीन सर्वोत्तम भूमिका कोणत्या? टाका एक नजर!