मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानीने ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तेव्हापासूनच ती फार चर्चेत आहे. आता राशा प्रसिद्धीच्या झोतात येण्यामागचे कारण म्हणजे तिची छुपी प्रतिभा, ज्याबद्दल रवीना किंवा राशा यांनी आजपर्यंत कोणालाही सांगितले नव्हते. आता रवीना आणि राशा या दोघींनीही असा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहिल्यानंतर केवळ या आई-मुलीच्या जोडीचे चाहतेच नाही तर हा व्हिडीओ पाहणाऱ्यांलाही जास्त आवडेल. जागतिक संगीत दिनानिमित्त रवीना आणि राशा यांनी त्यांचा हा व्हिडिओ शेअर केला आहे.
रवीना शेअर केला व्हिडिओ : रवीना आणि राशा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राशा गाणे गाताना दिसत आहे. गाणे हा शब्द खूपच सुंदर आहे, जेव्हा तुम्ही राशाच्या आवाजात तिची आवडती गायिका एमी वाईनहाऊसचे गाणे ऐकाल तेव्हा तुम्हाला तिचा आवज फार मधुर वाटेल.
राशाचा सुंदर आवाज : रवीनाने हा व्हिडीओ वर्ल्ड म्युझिक डेच्या निमित्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिले की, 'वर्ल्ड म्युझिक डे मी सेलिब्रेट करते. आपल्याला संगीत आणि गाण्याची भेट मिळाली आहे, आपल्या देशात खूप टॅलेंट आहे आणि आपण भाग्यवान आहोत की आपण संगीत आणि नृत्य कलेचा मुक्तपणे आनंद घेतो आणि संगीताने भरलेले आयुष्य जगण्यासाठी आपण खूप भाग्यवान आहोत, माँ सरस्वतीचा आशीर्वाद आपल्याला लाभला आहे, राशा एका चांगल्या गायिकेप्रमाणे गाते मला याचा मला खूप अभिमान वाटतो, मला माझ्या मुलीची ही प्रतिभा माहित नव्हती, तुम्ही माझ्या मुलीचे हे गाणे ऐका मगच तुम्ही माझ्याशी सहमत व्हाल, माझ्या कुटुंबात असा गायक असणे पुरेसे आहे, इथे मी राशा आणि तिच्या मावशी सोबत मजा करत आहे. त्याच वेळी, राशाने तिचा व्हिडिओ शेअर केला आहे आणि सांगितले आहे की, हे गाणे व्हॅलेरी आणि गायिका एमी वाइनहाउस आहे. तिला हे गाणे फार आवडते. तसेच रवीना ही सोशल मीडियावर फार सक्रिय आहे ती अनेकदा स्वता;चे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते आणि चाहत्यांशी संवाद साधत असते.
हेही वाचा :
Neeyat Trailer OUT: विद्या बालन स्टारर चित्रपट 'नीयत'चे ट्रेलर रिलीज
Kriti Sanon Mother: 'आदिपुरुष' चित्रपटाला समर्थन दिल्याने क्रिती सेनॉनची आई झाली ट्रोल