मुंबई : अभिनेत्री रवीना टंडन, गायिका वाणी जयराम आणि सुमन कल्याणपूर यांना यावेळी पद्म पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात येणार आहे. वाणी जयराम आणि सुमन कल्याणपूर या नऊ पद्मभूषण विजेत्यांपैकी आहेत. यंदाच्या 91 पद्मश्री पुरस्कार विजेत्यांमध्ये संगीतकार एम.एम. कीरावनी आणि बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन यांचा समावेश आहे. रवीना टंडनने या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. रवी टंडनने दिवंगत वडील यांना समर्पित केले आहे.
-
For 2023, the President has approved conferment of 106 Padma Awards incl 3 duo cases. The list comprises 6 Padma Vibhushan, 9 Padma Bhushan & 91 Padma Shri. 19 awardees are women & the list also includes 2 persons from category of Foreigners/NRI/PIO/OCI and 7 Posthumous awardees pic.twitter.com/Gl4t6NGSzs
— ANI (@ANI) January 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">For 2023, the President has approved conferment of 106 Padma Awards incl 3 duo cases. The list comprises 6 Padma Vibhushan, 9 Padma Bhushan & 91 Padma Shri. 19 awardees are women & the list also includes 2 persons from category of Foreigners/NRI/PIO/OCI and 7 Posthumous awardees pic.twitter.com/Gl4t6NGSzs
— ANI (@ANI) January 25, 2023For 2023, the President has approved conferment of 106 Padma Awards incl 3 duo cases. The list comprises 6 Padma Vibhushan, 9 Padma Bhushan & 91 Padma Shri. 19 awardees are women & the list also includes 2 persons from category of Foreigners/NRI/PIO/OCI and 7 Posthumous awardees pic.twitter.com/Gl4t6NGSzs
— ANI (@ANI) January 25, 2023
रवीनाची W20 मध्ये निवड : रवीना टंडन म्हणाली, मी अतिशय कृतज्ञ आहे. माझे योगदान, माझे जीवन, माझी आवड आणि उद्देश- सिनेमा आणि कला, ज्याने मला केवळ चित्रपटातच नाही तर मोठे योगदान दिले त्याबद्दल मी भारत सरकारचे खूप खूप आभार मानते. सिनेमाच्या या प्रवासात ज्यांनी मला मार्गदर्शन केले त्या सर्वांचे मी आभार मानते. याचे श्रेय मी माझ्या वडिलांना देते. रवीनाची W20 मध्ये प्रतिनिधी म्हणून देखील निवड झाली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
पुरस्कार राष्ट्रपती भवनात आयोजित : कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इ. विविध विषयांमध्ये/कार्यक्रमांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाला हे पुरस्कार दिले जातात. दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर केले जाणारे पुरस्कार राष्ट्रपती भवनात आयोजित औपचारिक कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केले जातात. हा समारंभ साधारणपणे दरवर्षी मार्च/एप्रिलच्या आसपास होतो.
106 लोकांच्या नावांचा समावेश : 2023 साठी, भारत सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्काराने सन्मानित केल्या जाणार्या नावांची यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यात 106 लोकांच्या नावांचा समावेश आहे. या यादीत 6 पद्मविभूषण, 9 पद्मभूषण आणि 91 पद्मश्री यांचा समावेश आहे. 19 पुरस्कारप्राप्त महिला आहेत आणि या यादीमध्ये परदेशी/NRI/PIO/OCI या श्रेणीतील 2 व्यक्ती आणि 7 मरणोत्तर पुरस्कारप्राप्त व्यक्तींचाही समावेश आहे. मुलायम सिंह यादव, संगीतकार झाकीर हुसेन, दिवंगत ओआरएस प्रणेते दिलीप महालानाबिस आणि एस.एम. कृष्णाल यांना पद्मविभूषण मिळेल.
क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण पुरस्कार : महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या एकूण 12 मान्यवरांची पद्म पुरस्कारांमध्ये वर्णी लागली आहे. पद्मभूषण पुरस्कारांच्या तीन मानकऱ्यांपैकी दीपक धर यांना विज्ञान आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात, कुमार मंगलम बिर्ला यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रात, तर गायिका सुमन कल्याणपूर यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण पुरस्कार देण्यात येईल.
हेही वाचा : दीपिका पदुकोण शाहरुख खानसाठी लकी, जोडीचा सलग चौथा ब्लॉकबस्टर