ETV Bharat / entertainment

Rashmika Mandanna : विजय देवरकोंडासोबत साजरा केला वाढदिवस म्हणणाऱ्यांवर रश्मिका मंदन्नाची प्रतिक्रिया - विजय देवरकोंडा

टॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या डेटिंगच्या अफवा बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय आहेत. अलीकडेच एका मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की रश्मिकाने तिचा वाढदिवस विजयसोबत साजरा केला आणि दोघेही एकमेकांना डेट करत आहेत.

Etv Bharat
रश्मिका मंदन्नाची प्रतिक्रिया
author img

By

Published : Apr 7, 2023, 5:25 PM IST

हैदराबाद - टॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या डेटिंगच्या अफवा अनेकदा ऐकायला मिळतात. अलीकडेच ट्विटरवरील एका मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की रश्मिका आणि विजय डेट करत आहेत आणि ते एकत्र राहत आहेत. रश्मिकाने तिचा वाढदिवसही विजयसोबत साजरा केला आहे. मात्र, अभिनेत्रीने लगेचच प्रतिक्रिया दिली आहे.

रश्मिका मंदान्नाची प्रतिक्रिया - काही बातम्यामध्ये दावा करण्यात आला आहे की, 'रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा एकमेकांना डेट करत आहेत. ते दोघे एकत्र राहतात. येत्या काळात रश्मिका मंदान्ना आणि विजय यांच्याबद्दल नक्कीच चांगली बातमी ऐकायला मिळेल. या ट्विटला उत्तर देताना रश्मिका मंदान्नाने लिहिले की, 'अय्यो, जादा विचार करू नका बाबू.' बुधवारी 27 वर्षांची झालेल्या रश्मिकाने वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी तिच्या चाहत्यांचे आभार मानणारा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर, रश्मिका आणि विजयच्या एकाच पार्श्वभूमीचा स्क्रीनशॉट समोर आला. पार्श्वभूमीत लाकडी छताला बल्ब लटकलेले दाखवले आहेत.

विजयने शुभेच्छा दिल्या की नाही? - रश्मिका मंदान्नाच्या वाढदिवसानिमित्ताने विजय देवरकोंडाने रश्मिकाला शुभेच्छा दिल्या किंवा नाही याचा शोध अनेकांनी घेतला. त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांची देवाण घेवाण झालेली नसल्याने अनेकांनी भुवया विस्फारल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यात बिनसल्याचे किंवा ब्रेकअप झाल्याचीही चर्चा सुरू झाली होती. अलिकडच्या काही पसरलेल्या बातमीनुसार रश्मिका मंदान्ना आणि विजय सध्या टेडिंग करत नाहीत. तर, ती सध्या लोकप्रिय तेलुगु अभिनेता बेल्लमकोंडा साई श्रीनिवाससोबत फिरत असते.

रश्मिका मंदन्नाची प्रतिक्रिया
रश्मिका मंदन्नाची प्रतिक्रिया

अर्थात, डेटिंगच्या अफवांवर रश्मिकाने अशी प्रतिक्रिया देण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही रश्मिकाने या अफवांचे खंडन करताना म्हटले होते की, 'बघा, विजय आणि मी आमच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला इतकं एकत्र काम केलं आहे, जेव्हा इंडस्ट्री कशी आहे हे कळत नाही आणि अचानक तुम्हाला समविचारी लोकांनी घेरलं जातं. जेव्हा तुम्ही एकत्र काम करायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला मित्र बनवायला आवडतात. यात बरेच सामान्य मित्र आहेत.

हेही वाचा - Allu Arjun's Look In Pushpa 2 :पुष्पाचा इंटरनेटवर थरथराट, वाढदिवसापूर्वी अल्लु अर्जुनच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठी भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.