मुंबई - Rashmika mandanna : साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर काही दिवस आधी खूप व्हायरल झाला होता. याप्रकरणी अनेकांनी याबद्दल चिंता व्यक्त केली होती. दरम्यान याप्रकरणी एक अपडेट समोर आली आहे. रश्मिका मंदान्नाचा डीपफेक व्हिडिओ ऑनलाइन अपलोड करणाऱ्या चार संशयितांचा पोलिसनं ताब्यात घेतलं आहे. मुख्य आरोपीचा शोध आता देखील सुरू आहे. पकडलेल्या चार संशयित हे याप्रकरणात सामील नसल्याचं निष्पन्न झालं आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
रश्मिका मंदान्नाचा डीपफेक व्हिडिओ : फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मालकी असलेल्या आणि ऑपरेट करणाऱ्या मेटा या कंपनीनं दिलेल्या तपशिलांच्या आधारे चार संशयितांपैकी तीन संशयितांबद्दल माहिती दिली गेली आहे. दरम्यान, या आरोपींनी कथितपणे त्यांच्या खात्यांमधून माहिती हटवल्यामुळं तपासातही अडथळे येत होते. दिल्ली पोलिसांचे सायबर स्पेशलिस्ट सध्या या पोस्टमागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहेत. रश्मिका मंदान्नाचा हा व्हिडिओ बनावट आयडी वापरून अपलोड केले गेला होता. व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) वापरल्यानं गुन्हेगाराचा पत्ता लावणं कठिण झालं होतं.
महिला आयोगानं केली होती मागणी : दिल्ली पोलिसांनी रश्मिका मंदान्नाच्या डीपफेक एआय-व्युत्पन्न व्हिडिओबद्दल विशेष सेलकडे माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करून एक महिना झाला आहे. याप्रकरणी दिल्ली महिला आयोगानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झालेल्या रश्मिका मंदान्नाच्या डीपफेक व्हिडिओवर कारवाई करण्याची मागणी केली होती. याप्रकरणाबद्दल केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 18 नोव्हेंबर रोजी सांगितलं होतं की, ''सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत आणि त्यांना अशा सामग्रीची ओळख पटवण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत''. 6 नोव्हेंबर रोजी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रश्मिकासारखी दिसणारी एक महिला काळ्या रंगाचा स्विमसूट परिधान करून लिफ्टमध्ये प्रवेश करत असल्याचं दिसून येते. रश्मिकाचा हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला होता.
हेही वाचा :