मुंबई- बॉलीवूड स्टार रणवीर सिंग त्याच्या कपड्यावरून आणि स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असतो. आता तो त्याच्या नेटफ्लिक्स इंडियाच्या पहिल्या संवादात्मक शो, 'रणवीर Vs वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स' मुळे चर्चेत आहे. 'रणवीर Vs वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स' ओटीटी पदार्पणसाठी सज्ज ( Ready To OTT Release ) झाला आहे. शुक्रवारी, नेटफ्लिक्स इंडियाने रणवीर Vs वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स'या शोचा नवीन ट्रेलर आऊट केला. जो 8 जुलै रोजी प्रदर्शित होईल. "अब @ranveersingh की जिंदगी आप के हाथ में है! बटन दाबाओ आणि उन्हे बचाओ ! #RanveerVsWildWithBearGrylls, Netflix भारताचा पहिला संवादात्मक शो ८ जुलै रोजी प्रदर्शित होईल. @ranveersingh @beargrylls" असं कॅप्शन देत नेटफ्लिक्स इंडियाने ही पोस्ट केली आहे.
ट्रेलरमध्ये, रणवीर सिंग होस्ट बेअर ग्रिल्ससोबत जंगलाचा अनुभव घेताना दिसत आहे. पत्नी, दीपिका पादुकोणसाठी एक खास फूल पकडताना देखील पाहायला मिळत आहे. लोक प्रेमासाठी चंद्र तारे तोडून आणतात, मी दीपिकासाठी एक खास फूल आणणार ( will bring a special flower For Deepika Padukone ) आहे. जे माझ्या प्रेमाप्रमाणे, कधीही न मरणारे आहे असे तो व्हिडीयोत म्हणत आहेत. ट्रेलरमध्ये पुढे जाताना रणवीर आणि बेअर ग्रिल्स पर्वत, जंगल आणि गुहांचा अनुभव घेताना दिसत आहेत. इतकेच नाही तर या सर्व परिस्थितीत रणवीर शक्य तितक्या मजेदार मार्गाने सर्व अडथळ्यांशी लढतानाही दिसत आहे. अक्षय कुमार, विकी कौशल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता रणवीर सिंग ग्रिल्ससोबत या साहसी आणि रोमांचक प्रवासाला निघाला आहे.
दरम्यान, रणवीरचा नुकताच 'जयेशभाई जोरदार' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.. आता दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'सर्कस' या सिनेमात तो झळकणार ( will be seen in Rohit Shetty's 'Circus' movie ) आहे..यात त्याच्यासोबत जॅकलीन फर्नांडिस आणि पूजा हेगडे देखील आहेत. त्याशिवाय, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' त्याच्या पाइपलाइनमध्ये आहे. आलिया भट्टसोबत तो पुन्हा एकदा या सिमेनात झळकणार आहे.
हेही वाचा - शिबानी दांडेकरने शेअर केले फरहान अख्तरचे बालपणीचे सुंदर छायाचित्र