ETV Bharat / entertainment

कान्समध्ये दीपिका पदुकोणच्या मांडीवर बसला रणवीर सिंह - पाहा व्हिडिओ - cannes film festival

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 मध्ये ज्युरी सदस्य म्हणून उपस्थित असलेल्या दीपिका पदुकोणचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये रणवीर सिंग दीपिकाच्या मांडीवर बसलेला दिसत आहे.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह
author img

By

Published : May 27, 2022, 5:27 PM IST

मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणचा फ्रान्समधील कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 मध्ये ज्युरी म्हणून समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, दीपिका सोशल मीडियावरही पूर्णपणे सक्रिय आहे. हा फिल्म फेस्टीव्हल २८ मे रोजी संपणार आहे. कार्यक्रम संपण्याच्या एक दिवस आधी दीपिका पदुकोणने कान्समधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दीपिका पदुकोण खूप मस्ती करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीचा पती आणि अभिनेता रणवीर सिंग देखील दिसला आहे.

सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये दीपिका पदुकोण तिच्यासोबत कान्समध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. त्याचवेळी या व्हिडिओमध्ये अभिनेता रणवीर सिंग दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दीपिकाची टीम तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे असे म्हणते, तर दीपिका म्हणते की इतका आवाज करणारा चिडीया पक्षी मला देऊ नका.

मग तिला एक मोठं चॉकलेट ऑफर केलं जातं आणि ती म्हणते की ही खूप छान भेट आहे. त्याचवेळी, काही वेळाने रणवीर सिंग व्हिडिओमध्ये दिसतो आणि तो दीपिकाच्या मांडीवर बसतो आणि अभिनेत्री म्हणते की ही माझी ट्रॉफी आहे. तेव्हा रणवीर म्हणतो की मी तिचा प्रेझेन्ट ( वर्तमान ) आहे.

रणवीर सिंग सध्या भारतात परतला आहे आणि तो 25 मे रोजी करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत दिसला होता. दीपिका आणि रणवीर कान्समध्ये मस्ती करतानाचे फोटो सोशल मीडियावर आले होते, ज्यामध्ये हे जोडपे हॉलिवूड अभिनेत्री रेबेका हॉलसोबत दिसले होते.

हेही वाचा - इस्तंबूलमधील कॉफी शॉपमध्ये श्रद्धा कपूरच्या कथित बॉयफ्रेंडसोबत सारा अली खान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.