मुंबई - Ranveer Singh : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगनं आपलं फिल्म इंडस्ट्रीमध्ये उत्तम बस्तान बसवलंय. एक अतिशय उत्साही, ऊर्जा असलेला अभिनेता अशी त्याची ओळक आहे. आपल्या सहज वागण्या बोलण्यानं तो सहकाऱ्यांची न जिंकुन घेतोय. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा त्याचा सर्वात अलीकडील चित्रपट हिट झाल्यानंतर रणवीर सिंगनं मुबईत दोन लग्जरियस अपार्टमेंट खरेदी केल्याची बातमी आहे. या घरांची किंमत आणि इतर तपशील आता पुढे आलाय.
रणवीर सिंगने अलीकडेच मुंबईतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर असलेल्या दोन भव्य लग्झरियर प्रॉपर्टी घेतल्या आहेत. या दोन्ही प्लॉटची एकत्रित किंमत 15.25 कोटी रुपये आहे. एक्स्प्रेस हायवेवरील ओबेरॉय मॉलजवळ गोरेगाव पूर्वेकडील ओबेरॉय एक्क्झिझिट इमारतीच्या ४३व्या मजल्यावर ही निवासस्थाने आहेत.
1,324 चौरस फुटांवर पसरलेल्या या फ्लॅटमध्ये सहा पार्किंगची जागा आहे. यासाठी रणवीरला प्रत्येक अपार्टमेंटसाठी 45.75 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागली होती. हा करार 6 नोव्हेंबरला फायनल झाला. रणवीरने गेल्या वर्षी वांद्रे वेस्टमध्ये 119 कोटींना क्वाड्रप्लेक्स देखील खरेदी केले होते.
कामाच्या आघाडीवर रणवीर सिंग हा रोहित शेट्टीच्याअॅक्शन-पॅक्ड चित्रपट सिंघम अगेन चित्रपटामध्ये झळकणार आहे. याबरोबरच तो फरहान अख्तर निर्मिती करत असलेल्या डॉन 3 मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पहिल्या दोन भागात डॉनची भूमिका शाहरुख खाननं साकारली होती. खरतंर 1978 मध्ये डॉन या चित्रपटाची निर्मिती पहिल्यांदा हिंदी सिनेसृष्टीत झाली. अमिताभ बच्चन यांनी यामध्ये अंडरवर्ल्ड डॉनची भूमिका केली होती. या चित्रपटाची कथा सलीम खान आणि जावेद अख्तर या जोडीनं लिहिली होती. हा त्या काळात चित्रपट सुपरहिट ठरला. यातील गाण्यांनाही अफाट लोकप्रियता मिळाली. या चित्रपटाची फ्रँचाईज बनवण्याचा विचार फरहान अख्तरने केला आणि त्यासाठी हक्क विकत घेतले. आजवर याचे दोन भाग बनले आहेत व तिसऱ्या भागात रणवीर सिंग डॉनची भूमिका करतोय.'डॉन 3' चे शूटिंग येत्या वर्षात सुरू होण्याची शक्यता आहे. हा चित्रपट 2024 मध्ये रिलीज करण्याची तयारी निर्मात्यांनी केलीय. या शिवाय अभिनेता रणवीर सिंग अलीकडेच 'कॉफी विथ करण'च्या आठव्या सीझनमध्ये पत्नी दीपिका पदुकोणसोबत दिसला होता.
हेही वाचा -
3. Big B Diwali Wishes : अमिताभ बच्चनची जलसामध्ये प्रार्थना, दिवाळी निमित्त दिल्या शुभेच्छा