ETV Bharat / entertainment

Show Me The Secret Ranveer Singh : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकत्र काम करणार - गुप्त गोष्ट

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण राम चरण आणि त्रिशा कृष्णन एका गुप्त गोष्टीचा उलगडा करण्यासाठी एकत्र आले आहेत. रणवीर सिंगने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन दाखविण्यात आली आहे. पहा हा व्हिडिओ

Ranveer Singh
रणवीर सिंग
author img

By

Published : Jul 3, 2023, 10:21 AM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे खूप चर्चेत आहे. लवकरच त्याचा रॉकी राणीची प्रेमकथा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. रणवीरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाल दाखवेल हे येणाऱ्या काळातच समजेल. या चित्रपटाकडून खूप आशा आहेत. दरम्यान, रणवीरने त्याच्या इंस्टाग्रामवर नवीन प्रोजेक्टचा एक छोटा व्हिडिओ अपलोड केला ज्यामध्ये पत्नी दीपिका पदुकोण त्याच्यासोबत दिसत आहे. यासोबतच त्यात साऊथचे दोन सुपरस्टार राम चरण आणि त्रिशा कृष्णन देखील दिसत आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

पुन्हा एकदा एकत्र काम करणार रणवीर दीपिका : बॉलिवूड सुपरहिट जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकदा एकत्र काम करणार असल्याचे दिसत या व्हिडिओमध्ये दिसत आहे. रणवीर एका गुप्तहेराच्या भूमिकेत आणि दीपिका तिच्या हरवलेल्या पतीचा शोध घेणारी स्त्री म्हणून दाखवण्यात आली होती. या क्लिपच्या सुरुवातीला दीपिका तिच्या बेपत्ता पतीबद्दल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करताना दिसत आहे . ती काळजीत आणि गंभीर दिसत आहे. तर रणवीर मिशनबद्दल काही माहिती मिळाल्यानंतर अ‍ॅक्शन मोडमध्ये आलेला दिसत आहे. तसेच क्लिपमध्ये फॅमिली मॅनमधील 'चेल्लम सर'ची एक झलकही दाखविण्यात आली आहे. इतकंच नाही तर राम चरण एका माणसाच्या मागे धावताना दिसतोय आणि त्रिशा कृष्णन पोलिस स्टेशनबाहेर उभी दिसत आहे. सरतेशेवटी, रणवीर एका माणसाला मारहाण करताना आणि त्याला बोलायला सांगत असल्याचे दाखविण्यात आहे.

रणवीरच्या व्हिडिओने रहस्य उलगडणार : हा व्हिडिओ शेअर करत रणवीरने कॅप्शन दिले आहे, 'लवकरच रहस्य उलगडणार आहे. या मोठ्या प्रकटीकरणासाठी संपर्कात रहा. असे त्याने लिहले आहे. रणवीर सिंगने आपल्या इंस्टाग्रामवर या नव्या प्रोजेक्टचा व्हिडिओ शेअर करून सस्पेन्स वाढवला आहे. ही क्लिप पाहिल्यानंतर चाहते याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. अद्यापही या चित्रपटाबाबत काही माहीती समोर आली नाही आहे. मात्र या व्हिडिओवर अनेक लोक कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले, 'ओह माय गॉड दीपिका, रणवीर आणि राम चरण... कृपया त्यांना चित्रपटात कास्ट करा.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'ही जाहिरात झाली तर लोकांचे मन बिघडेल.' अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहे.

हेही वाचा :

  1. documentary on Sylvester Stallone : सिल्वेस्टर स्टॅलोनच्या जीवनावर नेटफ्लिक्स बनवणार डॉक्युमेंटरी
  2. The Night Manager Part 2 : 'द नाईट मॅनेजर २' पाहून प्रेक्षक सुखावले, अनिल कपूरला म्हणाले झक्कास
  3. Ranveer Singh hilarious video : पाहा रणवीर सिंगचे 'तुम क्या मिले' गाण्यावर धमाल रील, आलियासह चाहतेही फिदा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.