मुंबई - Ranveer poses with MS Dhoni : क्रिकेटचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीसोबत हसत पोज देतानाचा अभिनेता रणवीर सिंगचा फोटो व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर रणवीरनं धोनीसोबतचा आपला सेल्फी फोटो शेअर केलाय. फोटो शेअर करताना त्यानं लिहिलंय, 'मेरा माही... हिरो, आयकॉन, लिजेंड, बिग ब्रदर.' रणवीरनं शेअर केलेली ही पोस्ट तुम्ही इन्स्टाग्रामवर पाहू शकता.
फोटोत रणवीर सिंग त्याचा सिम्बा लूकमध्ये उबर कुल ब्लॅक आऊटफिटमध्ये सुंदर दिसतोय. तर महेंद्र सिंग धोेनी त्याच्या नव्या लांब केसाच्या लूकमध्ये निळ्या टी शर्टसह दिसत आहे. दोन फोटोंच्या सेटमध्ये एका फोटोत रणवीर सिंग धोनीच्या गालाचं चुंबन घेताना दिसतोय.
रणवीरनं फोटो शेअर करता क्षणीच त्याचे फिल्म इंडस्ट्रीतील सहकारी मित्र यांनी कमेंट सेक्शनमध्ये गर्दी करायला सुरुवात केली. नूपुर सेनॉननं प्रतिक्रिया देताना म्हटलंय, एट द टॉप. दोन आवडते हिरो एका फ्रेममध्ये असं एका युजरनं लिहिलंय. आरआरआर चित्रपटाचा अभिनेता राम चरण यानेही बुधवारी एम एस धोनीसोबतचा एक फोटो शेअर करत, 'भारताचा अभिमान असलेल्या धोनीला भेटून आनंद झाला',असं लिहिलं होतं.
एम एस धोनी हा भारतीय क्रिकेट संघाचा करिष्माई विकेट किपर आणि बॅट्र होता. तो कॅप्टन कुल या नावानं ओळखला जात असे. त्यानं भारतीय संघासाठी 332 सामन्यांचं नेतृत्व केलं होतं. यातील178 सामने त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं जिंकले, 120 सामन्यात पराभव झाला आणि यापैकी सहा सामने बरोबरीत संपले तर 15 सामने अनिर्णीत राहिले होते. त्याचं कर्णाधार म्हणून जिंकण्याची सरासरी 53.61 टक्के इतकी होती. या आकड्यांचा मोळ जमवला आणि त्यानं जिंकलेल्या ट्रॉफीजचा विचार केला तर तो भारताचा सर्वाधित यशस्वी करणधार ठरतो.
या 332 सामन्यांमध्ये त्यानं 330 डावांमध्ये 46.89 च्या सरासरीने आणि 76 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 11,207 धावा केल्या आहेत. त्याने कर्णधार म्हणून 11 शतके आणि 71 दमदार अर्धशतकं ठोकली. यामध्ये 224 च्या सर्वोत्तम धावसंख्येचा समावेश आहे. कर्णधारपदाच्या ओझ्याचा एमएसवर अजिबात परिणाम झाला नाही आणि म्हणूनच तो कॅप्टन कुल ठरतो.
हेही वाचा -
1. Zeenat Aman Nickname : देव आनंदनं दिल होतं टोपण नाव, झीनत अमाननं सांगितला किस्सा
3. Leo Trailer Day: 'लिओट्रेलरडे' एक्सवर होतोय ट्रेंड; पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव