ETV Bharat / entertainment

Animal Teaser: रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' चित्रपटाची टीझर रिलीज डेट आली समोर... - रणबीर कपूरचा अ‍ॅनिमल चित्रपट

Animal Teaser: रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 'अ‍ॅनिमल' चित्रपटामध्ये रणबीर हा वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. दरम्यान आता या चित्रपटाची टीझर रिलीजची तारीख समोर आली आहे.

Animal Teaser
अ‍ॅनिमल टिझर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2023, 1:52 PM IST

मुंबई - Animal Teaser: रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटामध्ये रणबीरचा वेगळा लूक चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. 'अ‍ॅनिमल' चित्रपटाची घोषणा जेव्हापासून झाली, तेव्हापासून चाहते या चित्रपटाच्या टीझरची वाट पाहत आहेत. दरम्यान आता निर्मात्यांनी या प्रतिक्षेला पूर्णविराम दिला असून चित्रपटाच्या टीझर रिलीजची तारीख निश्चित केली आहे. याशिवाय या चित्रपटामधील रणबीर कपूरचा नवा लूकही समोर आला आहे. 'अ‍ॅनिमल' चित्रपटामध्ये रणबीर कपूर पहिल्यांदाच साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

'अ‍ॅनिमल'ची टीझर डेट आली समोर : टीझर रिलीज डेटसोबतच रणबीर कपूरचा नवा लूक समोर आल्यानंतर चाहते त्याचं कौतुक करत आहेत. या लूकमध्ये तो गॉगल घालून सिगारेट ओढताना दिसत आहे. टीझरची तारीख आणि नवीन लूक समोर आल्यानंतर चाहत्यांनी उत्सुकता दाखवली आहे. रणबीरच्या एका चाहत्यानी पोस्टवर कमेंट करत लिहलं, '28 सप्टेंबरला धमाका करणारा टीझर.' दुसऱ्या एका चाहत्यानं कमेंट करत लिहलं 'मला या चित्रपटाबद्दल इतका विश्वास आहे की, जर हा चित्रपट चांगला चालला नाही तर मी चित्रपट पाहणं बंद करेन.' अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत. रणबीरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचा टीझर त्याच्या वाढदिवसाला म्हणजेच 28 सप्टेंबरला 10 वाजता रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'अ‍ॅनिमल' चित्रपट चित्रपटगृहांमध्ये कधी होणार रिलीज : 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केलं आहे. रणबीर स्टारर 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे .रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्याशिवाय या चित्रपटात अनिल कपूर, तृप्ती डिमरी, परिणीती चोप्रा, आणि सौरभ शुक्ला यांसारखे प्रतिभावान स्टार्सही दिसणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात 8 गाणी असणार आहेत. यापूर्वी 'अ‍ॅनिमल'चा प्री-टीझर रिलीज झाला होता, जो खूप खास होता. हा प्री-टीझर प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या चित्रपटात रणबीर हा वेगवेगळ्या अवतारात दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा :

  1. Nayanthara : नयनतारानं पती विघ्नेश शिवनसह स्विमिंग पूलमध्ये केला एन्जॉय ; फोटो झाला व्हायरल...
  2. Jawan box office collection day 12 : शाहरुख खानचा 'जवान' जगभरात करत आहे धूम...
  3. Shabana Azmi Birthday: शबाना आझमी यांनी अभिनयाच्या जोरावर लोकांच्या मनात केलं घर...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.