ETV Bharat / entertainment

रणदीप हुड्डाने पाळले दलबीर कौरला दिलेले वचन, अंत्यसंस्कारासाठी पंजाबला रवाना - सरबजीत या चित्रपट

चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, दलबीर कौरने रणदीपला सांगितले की तिला सरबजीत सिंग त्याच्यात दिसतो आणि जेव्हा ती मरण पावेल तेव्हा तिला खांदा देण्याची विनंती केली होती. दलबीर कौर यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहून रणदीप हुड्डाने आपले वचन पूर्ण केले.

रणदीप हुड्डाने पाळले दलबीर कौरला दिलेले वचन

author img

By

Published : Jun 28, 2022, 10:13 AM IST

चंदीगड (पंजाब) - सरबजीत सिंगची ( Sarabjit Singh ) बहीण दलबीर कौर ( Dalbir Kaur ) यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अभिनेता रणदीप हुड्डा ­( Randeep Hooda ) याने अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी तातडीने पंजाबहून मुंबईला धाव घेतली. सरबजीतच्या शूटिंगदरम्यान रणदीप आणि दलबीर कौरमध्ये नाते निर्माण झाले होते.

सरबजीत या चित्रपटात रणदीपने दलबीर कौरचा भाऊ सरबजीत सिंगची भूमिका साकारली होती, जो 1990 मध्ये दारूच्या नशेत पाकिस्तानात गेला होता आणि त्याच्यावर अनेक गंभीर आरोपांसह त्याला 23 वर्षे तुरुंगात ठेवण्यात आले होते. 2 मे 2013 रोजी पाकिस्तानच्या तुरुंगात एका कैद्याने केलेल्या क्रूर हल्ल्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता.

चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, दलबीर कौरने रणदीपला सांगितले की तिला सरबजीत सिंग त्याच्यात दिसतो आणि जेव्हा ती मरण पावेल तेव्हा तिला खांदा देण्याची विनंती केली होती. दलबीर कौर यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहून रणदीप हुड्डाने आपले वचन पूर्ण केले. दलबीर कौर यांचे रविवारी पंजाबमधील अमृतसरजवळील भिखीविंड येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

दलबीर कौर यांच्या स्मरणार्थ रणदीपने इन्स्टाग्रामवर एक भावनिक नोटही लिहिली आहे. "घर जरूर आना ही शेवटची गोष्ट त्या म्हणाल्या होत्या. मी गेलो पण फक्त तीच निघून गेली होती. दलबीर कौर जी इतक्या लवकर आपल्याला सोडून जातील याची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही. एक सेनानी, मुलासारखी, कुशाग्र आणि त्या सर्वांसाठी समर्पित. तिने एका व्यवस्थेशी, देशाशी लढा दिला आणि तिने स्वतःचा प्रिय भाऊ सरबजीतला वाचवण्यासाठी प्रयत्न केला," असे रणदीपने लिहिले.

"तिचे प्रेम आणि आशीर्वाद मिळाल्यामुळे मी खूप भाग्यवान होतो आणि या आयुष्यात राखी कधीही चुकली नाही. गंमत म्हणजे आम्ही शेवटची भेट तेव्हा झाली जेव्हा मी पंजाबच्या शेतात शूटिंग करत होतो जिथे आम्ही भारत-पाक सीमा तयार केली होती. नोव्हेंबरच्या उशिरा थंडी आणि धुक्याची रात्र पण तिने या सगळ्याची पर्वा केली नाही. आम्ही सीमेच्या एकाच बाजूला आहोत याचा तिला आनंद वाटत होता. "खुश रहो, जुग जुग जिओ" असे ती म्हणायची. मला खरंच धन्य वाटतं. दलबीर जी यांच्याकडे पुरेसा वेळ नव्हता. माझे तुमच्यावर प्रेम आहे, मला तुमची आठवण येते आणि तुमचे प्रेम आणि आशीर्वाद मी नेहमी मानेन," असे रणदीपने शेवटी सांगितले.

ओमंग कुमारच्या सरबजीत या चित्रपटात दलबीर कौरची (ऐश्वर्या राय बच्चनने भूमिका केली आहे) तिचा भाऊ सरबजीतला न्याय मिळवून देण्यासाठी केलेला लढा यात दाखवला होता.

हेही वाचा - 'गुड न्यूज'नंतर करण जोहरसह दिग्गज बॉलिवूडकरांचा आलिया रणबीरवर अभिनंदनाचा वर्षाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.