मुंबई: ऑगस्ट 2023मध्ये अनेक बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारने त्याच्या बहुप्रतिक्षित आगामी चित्रपट 'ओह माय गॉड 2'ची रिलीज तारीख आज म्हणजेच 9 जून रोजी जाहीर केली आहे. याआधी सनी देओलचा 'गदर-2' हा चित्रपटही ऑगस्टमध्ये रिलीज होणार आहे. ऑगस्टमध्ये 'ओह माय गॉड 2' आणि 'गदर 2' रिलीज होण्याच्या भीतीने रणबीर कपूरने त्याच्या 'अॅनिमल' चित्रपटाकडे पाठ खेचली आहे. रणबीरचा 'अॅनिमल' चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता, पण आता प्रदर्शनाची तारीख ही पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे आता असे वाटत आहे की, अक्षय कुमार ऑगस्टमध्ये त्याच्या चित्रपटाद्वारे बाजी मारणार. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संदीप वंगा रेड्डी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा मल्टीस्टारर चित्रपट 'अॅनिमल' हा 11 ऑगस्टला रिलीज होणार नाही. या चित्रपटात रणबीर कपूर आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. त्याचबरोबर या चित्रपटात अनिल कपूर आणि बॉबी देओल देखील यांच्यासोबत दिसणार आहेत.
11 ऑगस्टला सनी-अक्षय आमनेसामने येणार आहेत : आता 11 ऑगस्टला सनी देओल आणि अक्षय कुमार बॉक्स ऑफिसवर आमनेसामने येणार आहेत. सनी देओलने 22 वर्षांनंतर त्याच्या गदर चित्रपटाचा दुसऱ्या भागाचा सीक्वेल तयार केला आहे. तर दुसरीकडे, अक्षय कुमार ओ माय गॉड 2मध्ये महाकालच्या भूमिकेत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे. आता पुन्हा एकदा गदर-२ मध्ये सनीचे भव्य रूप पुन्हा पाहायला मिळणार आहे.
15 ऑगस्टला सनी-अक्षयला मोठे आव्हान मिळणार आहे : इतकंच नाही तर स्वातंत्र्य दिनानिमित्त (15 ऑगस्ट 2023) 11 ऑगस्टनंतर तीन दिवसांनी 'द काश्मीर फाइल्स' या वादग्रस्त चित्रपटाचा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री पुन्हा एकदा त्याच्यासोबत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसणार आहे. आगामी चित्रपट 'द व्हॅक्सिन वॉर' ते घेवून येणार आहे. तर आता ऑगस्ट महिना प्रेक्षकांसाठी उत्तम मनोरंजनाचा ठरणार आहे, कारण 25 ऑगस्टला ड्रीम गर्ल 2 आयुष्मान खुराना हा रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी येणार आहे या चित्रपटात आयुष्मानसोबत अनन्या पांडे ही देखील असणार आहे.
हेही वाचा :