मुंबई - रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या त्यांच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतलेले आहेत. या चित्रपटातून रणबीर आणि आलिया पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. अशा परिस्थितीत ही जोडी रात्रंदिवस चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. हा चित्रपट उद्या म्हणजेच ९ सप्टेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे. नुकताच रणबीर कपूरचा 'शमशेरा' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. जो बॉक्स ऑफिसवर प्रचंड फ्लॉप ठरला होता. 'ब्रह्मास्त्र'च्या प्रमोशनदरम्यान रणबीर कपूरने 'शमशेरा'च्या फ्लॉपवर मौन सोडले असून चित्रपट फ्लॉप होण्याचे कारणही सांगितले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
का फ्लॉप झाला 'शमशेरा' - दिल्लीतील प्रमोशनदरम्यान रणबीर कपूरने चित्रपटातील कमकुवत कंटेंट हे शमशेरा फ्लॉप होण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण असल्याचे सांगितले. चित्रपटांमध्ये समृद्ध आशय दिला तरच प्रेक्षकांना तो आवडेल, असे रणबीर म्हणाला. चित्रपटातील भावना, हसणे, रडणे हे प्रेक्षकांसाठी महत्त्वाचे असते, आशय हे सर्व नसेल तर चित्रपट चालणे अवघड आहे.
ब्रह्मास्त्रमध्ये काय आहे खास - बॉलिवूडच्या बहिष्कारामुळे बॉक्स ऑफिसवर एकामागून एक चित्रपट ज्याप्रकारे आपटत आहेत. 'ब्रह्मास्त्र'च्या टीमलाही भीती वाटते की, चित्रपटाची अवस्था 'शमशेरा'सारखी तर होणार नाही. रणबीर आणि आलियासाठी हा चित्रपट खूप खास आहे, पण हा चित्रपट प्रेक्षकांसाठी किती खास आहे हे येत्या तीन दिवसात कळेल. मात्र, रणबीर-आलियाचे चाहते गेल्या पाच वर्षांपासून या चित्रपटाची वाट पाहत आहेत.
हा चित्रपट अनेक कारणाने खास आहे, पहिले म्हणजे या चित्रपटात रणबीर आलिया पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे, शाहरुख खानचा कॅमिओ आणि अयान मुखर्जीने तयार केलेल्या चित्रपटाची कथा. चित्रपटाच्या आगाऊ तिकिटांची लगबग जोरात सुरू असली तरी आलिया आणि रणबीरच्या भवितव्याचा फैसला ९ सप्टेंबरला होणार आहे.
हेही वाचा -बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार कपिल शर्माच्या 'झ्विगाटो'चा प्रीमियर