मुंबई - बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या कारला मुंबईत आगामी चित्रपट शमशेराच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमासाठी जात असताना अपघात झाला आहे. मीडिया संवादादरम्यान, रणबीरने संपूर्ण घटना कथन केली आणि ट्रेलर लॉन्चसाठी त्याला उशीर का झाला हे स्पष्ट केले.
शमशेरा ट्रेलर लॉन्चसाठी रणबीर कार्यक्रमस्थळी पोहोचत असताना ही घटना घडली. अभिनेत्याने सांगितले की, तो मॉलमधून बाहेर पडत असताना कोणीतरी त्याच्या कारला धडक दिली. या अपघातात त्याच्या कारची काच फुटली पण सुदैवाने अभिनेता सुखरूप बचावला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
रणबीरने सांगितले की, त्याचा ड्रायव्हर त्याला चुकीच्या ठिकाणी घेऊन गेला आणि तिथून परत येत असताना कोणीतरी त्याच्या कारला जोरात धडक दिली. मीडिया आणि शमशेरा चित्रपटाची टीम रणबीर ट्रेलर लॉन्चला पोहोचण्याची प्रतीक्षा करीत होते. त्याने स्टेजवर खुलासा करेपर्यंत या घटनेबद्दल सगळेजण अनभिज्ञ होते. अभिनेता म्हणाला की जरी त्याचा दिवस खूप चांगला नसला तरी, त्याला आशा आहे की चित्रपट चांगला चालेल.
दरम्यान, शमशेराचा नुकताच रिलीज झालेला ट्रेलर रणबीर कपूरच्या चाहत्यांसाठी एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नाही. रणबीर एका गुलामाची मुख्य भूमिका साकारत आहे, जो आपल्या टोळीला वाचवण्यासाठी नेता बनल्याचे ट्रेलररमध्ये दिसते. संजय दत्तने लोकांचा छळ करणाऱ्या दरोगा शुद्ध सिंग या प्रतिपक्षाची भूमिका केली आहे. आदित्य चोप्रा निर्मित आणि करम मल्होत्रा दिग्दर्शित, शमशेरा, 22 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - शिबानी दांडेकरने शेअर केले फरहान अख्तरचे बालपणीचे सुंदर छायाचित्र